News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

फलटण ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील डीपी चोरी करणारी टोळी फलटण ग्रामीण पोलीसांकडुन जेरबंद !

फलटण ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील डीपी चोरी करणारी टोळी फलटण ग्रामीण पोलीसांकडुन जेरबंद !


डी पी चोरीचे १८ गुन्हे उघडकीस आणून त्यामध्ये एकुण ८,८०,०००/-रु. चा मुद्देमाल जप्त करून एकूण ०३ जण अटकेत पोलीस अधीक्षक मा. समिर शेख सो, अपर पोलीस अधीक्षक मा, बापू बांगर व उपविभागीय पोलीस अधिकारी मा. राहुल धस यांचे मार्गदर्शनानुसार पोलीस निरीक्षक सनिल महाडीक यांच्या नेतृत्वाखाली फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन गुन्हे प्रकटीकरण पथकाची सातत्य पुर्वक चमकदार कामगिरी


फलटण :- फलटण ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील डी पी चोरीचे गुन्हयानी डोके दरकाढले होते. डी पी चोरीच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक, सातारा मा. समिर शेख सो यांनी सूचनादिल्या होत्या त्यानुसार अपर पोलीस अधीक्षक मा. बापू बांगर सी, उपविभागीय पोलीस अधिकारी मा. राहुल यस सोय पोलीस निरीक्षक सनिल महाडीक यांच्या मार्गदर्शनाखाली फलटण ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीत होणा-या डी पी बोरीच्या गुन्ह्यांना प्रतिबंध होऊन ते उचल करण्याकरीता गुन्हे प्रकटीकरण शाखेकडून विशेष पथक तयार करण्यात आले होते. हे विशेष पथक वरील गुन्हाच्या अनुषंगाने फलटण ग्रामीण पोलीस ठाणे हदीत जी पी चोरी अनुषंगाने आरोपींचा शोध तांत्रीक विश्लेश्न करुन आरोपी नामे १) संतोष जगन्नाथ घाडगे २) सागर युवराज घाटगे ३) किरण निमराव घाडगे सर्व रा मलटण ता फलटण जि सातारा व त्यांचे इतर साथीदार यांनी की भी चोरी केलेची माहीती मिळालेने गुन्हे प्रकटीकरण तपास पथकाने त्यांचा शोध घेवुन वरील आरोपी पैकी ५) संतोष जगन्नाथ घाडगे २) सागर युवराज घाडगे ३) किरण भिमराव घाडगे सर्व रा मलटण सा फलटण जि. सातारा यांना ताब्यात घेतले त्यांचेकडे विचारपुस करता त्यांनी सुरुवातील उडवा उडवीची उत्तरे दिली. परंत ु त्यारा फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात आणून त्याचेकडे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कौशल्यपूर्ण तपास केला असता त्यांनी इतर साथीदारांसह फलटण तालुक्या मध्ये तरोध वाठार पोलीस ठाणे व लोणंद पोलीस ठाणे व फलटण शहर पोलीस ठाणे हद्दीमधील डी पी चोरी केले असलेचे कबुली दिली आहे. त्यानुसार त्यांचेकडुन विवीध ठिकाणी चोरी केलेली सुमारे ३,८०,०००/- किमतीचे एकूण ३८० किलो वजनाचे तांबे व चोरी करण्यास वापरलेले वाहन ओमनी असा एकूण ८,८०,०००/- रुपयाण मुद्देमाल हस्तगत करण्यात आला गुन्ह्यांचा तपास अद्याप सुरु असून अटक आरोपांनी आणखी कोठे काही गुन्हे केले आहेत काय याचा तपास पुढे चालु आहे,
सदरची कामगीरी पोलीस अधीक्षक मा. समिर शेख सो यांनी सूचना दिल्या होत्या. त्यानुसार अपर पोलीस अधीक्षक मा. बापू बांगर सो, उपविभागीय पोलीस अधिकारी ना. राहुल बस सो व पोलीस निरीक्षक सनिल महाडीक यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सागर अरगडे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मोहण हांगे, पोलीस हवालदार अरुण शेंडे, महादेव पिसे, पोलीस नाईक नितीन चतुरे, अगोल जगदाळे, तुषार आडके, पोलीस कॉन्स्टेबल विक्रम कुंभार, तुषार नलवडे, हनुमंत दडस श्रीकांत खरात यांनी या कारवाईमध्ये भाग घेतला होता.

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Next
Newer Post
Previous
This is the last post.

Post a Comment