कालकतिथ मा. श्री. रवींद्र हरिभाऊ काकडे (वस्ताद) यांच्या वाढदिवसानिमित्त सामजिक उपक्रमाचे आयोजन
आज दि. १ एप्रिल २०२४ रोजी ,
कालकतिथ मा. श्री. रवींद्र हरिभाऊ काकडे (वस्ताद) यांच्या वाढदिवसानिमित्त सालाबाद प्रमाणे या ही वर्षी एक उपक्रम राबविण्यात आला, जसा मागील वर्षी अन्नदान तसा या वर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.असे मानले जाते की , रक्तदान हे अक्षरशः जीवनरक्षक आहे. जात, पंथ, धर्म आणि इतर गोष्टींचा विचार न करता लोकांना एकत्र आणणारे हे मानवतेचे लक्षण आहे.
कालकतिथ मा. श्री. रवींद्र हरिभाऊ काकडे (वस्ताद) यांना सामाजिक कार्याची खूप आवड होती म्हणून दरवर्षी त्यांच्या परिवाराकडून वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबविले जातात. आदित्य ऍग्रो, काळज, ता.फलटण यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार पेठ, फलटण येथे आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरास अनेकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
काकडे परिवारातर्फे या पूर्वी अनाथ आश्रमात अन्नदान, शालेय विध्यार्थ्यांना शालेय साहित्य व गरजूंना आर्थिक मदत तर या वर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
जवळपास २५ ते ३० रक्तदात्यांनी रक्तदान केले आणि शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
दरम्यान, प्रत्येक रक्तदात्यास काकडे कुटुंबियांच्या वतीने हेल्मेट, टिफिन बॉक्स, ट्रॅव्हल बॅग व स्कुल बॅग असे विविध भेट वस्तू देऊन प्रोत्साहनपर प्रमाणपत्र देण्यात आले.
यावेळी डॉ. राजवैद्य व त्यांचे सहकारी तसेच काकडे कुटुंबातील सदस्य उपस्थित होते.
Post a Comment