डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३वी जयंतनिमित्त फलटण तालुका पत्रकारांच्यावतीने सत्कार सारंभ संपन्न झाला.
दि.१४ एप्रिल २०२४ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त सकाळी १० वाजता येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास फलटण तालुक्यातील पत्रकारांच्यावतीने अभिवादन करण्यात आले. त्यानंतर १०:३० वाजता डेक्कन चौक येथील हॉटेल अशोकामधील सांस्कृतिक सभागृहात, स्पर्धा परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा, नोटरी व सरकारी वकीलपदी नियुक्त झालेल्या वकिलांचा सत्कार प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी फलटण उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस, तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव, पोलीस निरीक्षक हेमंतकुमार शहा(फलटण शहर), पोलीस निरीक्षक सुनील महाडिक(फलटण ग्रामीण), मुधोजी हायस्कूल चे माजी प्राचार्य येवले सर यांच्यासह फलटण शहर व तालुक्यातील विविध वृत्तपत्रातील पत्रकार उपस्थित होते.
साप्ताहिक लोकध्यास चा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३वी जयंतनिमित्त विशेष अंक प्रकाशन सोहळा देखील संपन्न झाला.
सर्व प्रमुख मान्यवरांच्या व सत्कार मूर्तींच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. या सोहळ्यामध्ये सहाय्यक सरकारी वकील ॲड. शितल भोसले, ॲड. बापूसाहेब शिलवंत, ज्येष्ठ पत्रकार मा. रमेश आढाव, ज्येष्ठ पत्रकार मा. शामराव अहिवळे, पत्रकार विकास अहिवळे, ॲड.रोहित अहिवळे ॲड. सुजित निकाळजे, प्रणित कांबळे , डॉ. दिपाली जगताप (PhD Botony), कृषी सहाय्यक सोनाली काशिद, कृषी सहाय्यक शुभांगी जगताप, पत्रकार बापूराव जगताप, पत्रकार सचिन मोरे, पत्रकार ऋषिकेश आढाव, पत्रकार अमन खान, पत्रकार सागर चव्हाण उपस्थित होते.
Post a Comment