News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

१० तासात तपास करून निंभोरे दुहेरी खूनाच्या आरोपीस फलटण पोलिसांनी केले अटक.

१० तासात तपास करून निंभोरे दुहेरी खूनाच्या आरोपीस फलटण पोलिसांनी केले अटक.

१० तासात तपास करून निंभोरे दुहेरी खूनाच्या आरोपीस फलटण पोलिसांनी केले अटक.

फलटण:     पालखी महामार्गावरील निंभोरे, ता. फलटण येथे सुमित तुकाराम शिंदे, वय २० व शीतल तुकाराम शिंदे उर्फ शीतल रणजित फाळके, वय ३५ या बहीण-भावाचा निघृण खून करण्यात आला. या दुहेरी खून प्रकरणातील संशयिताला फलटण ग्रामीण पोलिसांनी केवळ १० तासांमध्येच अटक केली. रणजित मोहन फाळके (सध्या रा. निंभोरे, ता. फलटण, मूळगाव सातारारोड, ता. कोरेगाव, जि. सातारा) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन वरून मिळालेल्या अधिक माहितीनुसार,

निंभोरे, ता. फलटण येथे पालखी महामार्गावरील उड्डाणपूल नजीक सुमित तुकाराम शिंदे वय २० वर्ष व शीतल तुकाराम शिंदे उर्फ शीतल रणजित फाळके वय ३५ वर्ष दोघे रा. सुंदरनगर, निंभोरे, ता. फलटण यांचे मृतदेह रस्त्याचे कडेला मिळुन आल्यावर लागलीच पोलीसांनी घटनास्थळाची पाहणी केली असता, दोघांच्या छातीवर धारदार व टोकदार भोकसल्यामुळे, त्यातुन रक्तस्त्राव झाल्याचे दिसुन आले. सदर घटनेतील दोन्ही मृत व्यक्ती हे नात्याने सख्खे बहीणभाऊ आहेत, त्या दोघांचे खुन अज्ञात व्यक्तीने केला म्हणुन फलटण ग्रामीण पोलीस ठाणे, गु. र. नं. ५२०/२०२४, भा. दं. सं. कलम ३०२ नुसार खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या खुनाची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस, फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक हे फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले. घटनेचा तपास करत असताना चारित्र्याच्या संशयावरून हे खून झाल्याचे तपासात समोर आले. निंभोरे, ता. फलटण येथे पालखी महामार्गावरील उड्डाणपूल नजीक असलेल्या झोपडीमध्ये शीतल व सुमित हे बहीण-भाऊ त्यांच्या आई वडिलांसमवेत राहत होते.शीतल हिने दोन वर्षापुर्वी तिचा पहिला नवरा कनवऱ्या भिमऱ्या पवार रा. वाळवा, जि. सांगली यास सोडुन देऊन रणजित मोहन फाळके, मुळगाव सातारारोड, ता. कोरेगाव, जि. सातारा याचेबरोबर तिच्या आईवडीलांसोबत झोपडीमध्ये पती-पत्नीप्रमाणे राहत होती. घटना घडली त्यावेळी रात्री फाळके हा त्यांच्यासमवेत झोपडीत झोपला होता.शनिवारी सकाळी ६.१५ च्या सुमारास पालखी महामार्गालगत सुमित तुकाराम शिंदे व शीतल तुकाराम शिंदे उर्फ शीतल रणजित फाळके या बहीण भावाचा धारदार शस्त्राने वार करून निघृण खून करण्यात आल्याचे निदर्शनास आल्यानंतर संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली. सकाळी मृतदेह मिळाल्यानंतरही रणजित फाळके तिथेच फिरत होता, परंतु घटनास्थळी पोलीस आल्याचे पाहून त्याने तेथून पलायन केले. ही बाब पोलिसांच्या लक्षात येताच त्यांनी तंत्रज्ञानाच्या मदतीने शोध घेत त्यास सातारारोड येथून ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता सुरुवातीस त्याने पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिसी खाक्या दाखविताच त्याने दि. २५ मे रोजी मध्यरात्री शीतल ही परपुरुषाबरोबर कोठेतरी जात असल्याचे दिसल्यामुळे मी झोपडीतील चाकू घेऊन तिच्या मागे गेलो. काही अंतरावर गेल्यानंतर शीतलला गाठून मी तिच्या छातीत चाकूने वार करून तिचा खून केला. त्यावेळी तिच्यासमवेत असलेला तिचा भाऊ सुमित शिंदे यास अंधारात न ओळखल्यामुळे तो परपुरुष आहे, असा गैरसमज होऊन आपण त्याच्याही छातीत चाकू खुपसून त्याचाही निघृण खून केल्याची कबुली दिली. या प्रकरणी रणजित फाळके याच्यावर कलम ३०२ नुसार खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तपासामध्ये मयत बहीणभाऊ हे 'अनुसुचित जमाती' या प्रवर्गातील असल्याचे व आरोपी रणजित मोहन फाळके हा 'खुल्या' प्रवर्गातील असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर अॅट्रॉसिटी कायद्यातील कलमांची वाढ केली आहे. 

सदर तपास पोलीस प्रमुख समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक आंचल दलाल, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरुण देवकर, पोलीस निरीक्षक सुनील महाडिक, सहायक पोलीस निरीक्षक नवनाथ रानगट, अशोक हुलगे, रोहित फार्णे, पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे, मच्छिंद्र पाटील, गोपाल बदने, पोलीस अंमलदार मोहन हांगे, पांडुरंग हजारे, बबन साबळे, महादेव पिसे, संतोष सपकाळ, प्रविण फडतरे, अजित कर्णे, अरुन पाटील, शिवाजी भिसे, अमित माने, अविनाश चव्हाण, गणेश कापरे, ओंकार यादव, मोहन पवार, रोहित निकम, विशाल पवार, वैभव सावंत, केतन शिंदे, शिवाजी गुरव, अमृत कर्पे, वैभव सूर्यवंशी, नितीन चतुरे, संदीप मदने, अमोल जगदाळे, विक्रम बनकर, श्रीनाथ कदम, अमोल पवार, संजय देशमुख, अमोल देशमुख, संभाजी साळुंखे, विक्रम कुंभार, हनुमंत दडस, रशिदा पठाण, प्रिती काकडे, उर्मिला पेंदाम, भाग्यश्री सुरुम, श्रीकांत खरात, अरुधंती कर्णे, शिवराज जाधव या सर्व कर्मचाऱ्यांनी या गुन्ह्याचा छडा लावत संशयिताला जेरबंद केले आहे.

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment