लोकसभा सार्वत्रिक निवडणुका २०२४ च्या निकालाच्या अनुषंगाने फलटण ग्रामीणपोलीस ठाणे तर्फे सर्व ग्रुप ॲडमिन व नागरिकांना जाहीर आवाहन.
Lok Sabha General Election 2024 |
फलटण ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील सर्व सुजाण नागरिकांना यांना याद्वारे जाहीर आवाहन करण्यात येते की, लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्याअनुषंगाने दिनांक ०१/०३/२०२४ पासून ते दिनांक ०६/०६/२०२४ रोजी पर्यंत आदर्श आचारसंहिता अंमलात असून, सातारा जिल्ह्यासह संपूर्ण देशभरात लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ चा निकाल दिनांक ०४/०६/२०२४ रोजी जाहीर होणार असून त्या अनुषंगाने आपणांस सुचित करण्यात येते की, कोणीही नागरिक सदर निवडणूक निकाल दरम्यान व निकाल जाहीर झाल्यानंतर सोशल मीडियाद्वारे फेसबुक, इंस्टाग्राम, व्हाट्सअप ग्रुप व इतर सोशल मीडिया तसेच तत्सम एप्लीकेशनच्या किंवा इतर कोणत्याही इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे कोणत्याही समाजाच्या, जातीच्या, धर्माच्या भावना दुखावतील अशा स्वरूपाच्या पोस्ट, कॉमेंट्स, स्टोरी, स्टेटस, रिलस, डिजिटल बॅनर असे प्रकार वरील माध्यमाद्वारे करू नयेत. तसेच कोणाचेही विरोधात घोषणाबाजी करू नये, डीजे वाजवणार नाहीत, फटाके फोडणार नाहीत.
If you are a Group Admin, then Stay Careful. |
तसेच विनापरवाना विजयी मिरवणूक काढू नये. व्हाट्सअप ग्रुपचे ॲडमिन यांनी त्यांच्या ग्रुपच्या सेटिंग मध्ये Only Group Admin असा बदल करून घ्यावा, जेणेकरून ग्रुप मधील कोणताही सदस्य वादग्रस्त पोष्ट ग्रुप वर टाकणार नाहीत. जर ॲडमिन यांनी सेटिंग मध्ये बदल केला नाही व कोणी सदस्याने वादग्रस्त पोस्ट टाकल्याने काही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास पोस्ट करणाऱ्या सदस्यासह ग्रुप ॲडमिन ला जबाबदार धरून योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी.
Post a Comment