News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

हनीट्रॅपचा पर्दापाश करण्यात फलटण ग्रामीण पोलीसांना यश.

हनीट्रॅपचा पर्दापाश करण्यात फलटण ग्रामीण पोलीसांना यश.

 हनीट्रॅपचा पर्दापाश करण्यात फलटण ग्रामीण पोलीसांना यश.

फलटण :

फलटण शहरातील एका हॉटेल व्यावसायिकाला प्रेमाच्या जाळ्यात अडकवुन त्याचे अपहरण करुन त्यास निर्जन ठिकाणी घेऊन जाऊन मारहाण करन त्याच्याकडुन 4 लाख रुपये खंडणी उकळण्याचा प्रयत्न करणा-या टोळीतील एका महिलेसह सहाजणांना 12 तासांच्या आत पकडण्यात फलटण ग्रामीण पोलीस यशस्वी झाले आहेत.

फलटण ग्रामीण पोलीस ठाणे, गु. र. नं. 885/2024 भा. न्या. संहिता 2023 चे कलम 140(2), 308(6)(7), 126(2), 115(2), 352, 351(2), 61(2) मधील तक्रारदार सजल विलास दोशी, वय 37 वर्ष, जात - जैन, व्यवसाय हॉटेल, रा. न्यु भारत साडीसेंटरसमोर, रविवारपेठ, ता. फलटण, जि. सातारा यांनी दि. 30/08/2024 रोजी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात येऊन तक्रार दिली की, त्यांचे फलटण शहरांमध्ये 'हॉटेल चॉईस' या नावाने हॉटेल व्यवसाय आहे. मागील चार महिन्यापासून त्यांच्या हॉटेलमध्ये एक महिला अधून मधून जेवणाचे पार्सल नेण्यासाठी येत होती. सदर महिलेचा मोबाईल क्रमांक त्यांच्याकडे होता. तिचे नाव 'माया' असे ते सांगत होते. एवढीच माहिती त्यांच्याकडे होती. सदर महिला व त्यांची ओळख झाल्यानंतर दिनांक 30/08/2024 रोजी यातील तक्रारदार यांच्यासोबत ती फिरायला जाण्यासाठी तयार झाली. फिर्यादी यांनी सदर महिलेला दिनांक 30/08/2024 रोजी सुरवडी या ठिकाणावरून त्यांच्या मोटरसायकलवर घेतले. त्यानंतर त्यांनी लोणंद, वीरधरण या ठिकाणी फेरफटका मारल्यानंतर सुरक्षित लॉज शोधत होते. परंतु त्यांना सुरक्षित लॉज न मिळाल्याने ते परत येत असताना त्यांना काळज-बडेखान जवळ दोन इसमानी अडवुन "आमच्या बहिणीला घेऊन कुठे घेऊन फिरता" असे म्हणून त्यांना मारहाण केली. तसेच त्यांना गाडीवरून रस्त्याच्या बाजूला घेऊन गेले त्यावेळेस सदर त्याच्या सोबत असलेली महिला ही त्या ठिकाणावरून निघून गेली. त्यानंतर फिर्यादी यांना मारहाण करून रात्री अकरा वाजेपर्यंत वरील दोघेही इसम व आणखी एक इसम हे त्याच्यावर बलात्काराची केस दाखल करणार आहेत अशी धमकी देत होते. फिर्यादी यांच्याकडून बळजबरीने त्यांनी फोन पे द्वारे 26 हजार रुपये घेतले व फिर्यादी यांना उद्या आणखी चार लाख रुपये घेऊन येण्यास सांगितले. नाही आला तर त्याचे नग्न काढलेले व बलात्कार केल्याबाबत वदवुन घेतेलेल व्हीडोओ व्हायरल करण्याची धमकी दिली. पोलिसांना एवढी माहिती असताना पोलिसांनी गोपनीय माहिती काढून सदर महिलेचा शोध घेऊन तिला ताब्यात घेतले व तिच्याकडे कौशल्यपुर्ण तपास केला असता फलटण शहरांमधील रेकॉर्डवरील खालील गुन्हेगार तिच्यासोबतच्या कटात सामील असल्याचे तपासात निष्पन्न झाले.

1. उमेश संजय खोमणे वय 28 वर्ष, रा. खराडेवाडी, ता. फलटण, जि. सातारा 

2. गणेश बाळु मदने वय 19 वर्ष, रा. बाचसर्कल, खामगाव, ता. फलटण, जि. सातारा

3. कुमार उर्फ बोक्या लक्ष्मण शिंदे वय 28 वर्ष, रा. भाडळी खुर्द, ता. फलटण, जि. सातारा 

4. जयराज उर्फ स्वागत आनंदराव चव्हाण वय 26 वर्ष, रा. झिरपवाडी, ता. फलटण, जि. सातारा

5. आकाश काशिनाथ डांगे वय 30 वर्ष, रा. भाडळी बु, ता. फलटण, जि. सातारा

6. अनिल गजरे (पुर्ण नाव व पत्ता माहित नाही)

7. माया (टोपण नाव) वय - 30 वर्ष

वरील गुन्हेगार सदर महिलेच्या मदतीने प्रत्यक्ष फिर्यादीला लुटत होते व काही लोक हे मोबाईलद्वारे इतर आरोपींच्या संपर्कात राहून आरोपीला हनीट्रॅपमध्ये अडकून सुव्यवस्थितपणे कट करून फिर्यादी कडून पैसे काढत होते. पोलिसांनी कसून तपास करून वरील नावे निष्पन्न केलेली आहेत. व ते सराईत असल्यामुळे फरारी होण्याची शक्यता धरुन तात्काळ गोपनीयरीत्या माहिती काढुन त्यांना अटक केली आहे. या टोळीने फलटण लोणंद या भागात सुद्धा अनेक लोकांना यापूर्वी हनीट्रॅपमध्ये अडकवलेले असण्याची शक्यता आहे. अशा लोकांनी आपल्या संबंधित पोलीस ठाणेशी किंवा फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याशी संपर्क करावा.




Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment