News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून ॲड. कांचनकन्होजा धोंडीराम खरात यांची अपक्ष उमेदवारी

फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून ॲड. कांचनकन्होजा धोंडीराम खरात यांची अपक्ष उमेदवारी

 फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून ॲड. कांचनकन्होजा धोंडीराम खरात  यांनी आज अपक्ष उमेदवारी अर्ज मा. निवडणूक निर्णय अधिकारी - मा. सचिन ढोले साहेब यांचे कडे दाखल केला.


मा. निवडणूक निर्णय अधिकारी - मा. सचिन ढोले साहेब यांचे कडे अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. 

फलटण :  प्रसारमाध्यमांना दिलेल्या माहितीमध्ये त्या म्हणाल्या की, मी ॲड. कांचनकन्होजा धोंडीराम खरात जाहीर करते की, येत्या 2024च्या विधानसभेच्या फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून मी माझा उमेदवारी अर्ज अपक्ष म्हणून दाखल केला आहे.

माझे शिक्षण बी.एस.सी. (मायक्रोबायोलॉजी), एम.एस.सी. (व्हायरॉलॉजी),डी.एम.एल.टी., डिप्लोमा इन मास कम्युनिकेशन अँड जर्नालिझम, एल.एल.बी. (स्पेशल), एल.एल.एम (क्रिमिनल लॉ) असे झाले आहे. मी माझी उमेदवारी जाहीर करण्याचे कारण म्हणजे माझ्या मतदारसंघातील वाढती बेरोजगारी, शेतकरी राजावर होणारे असंख्य अन्याय, अत्याचार तसेच शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत. ते सोडविण्यासाठी जसे की, दुधाचा प्रश्न, पाण्याचा प्रश्न, विजेचा प्रश्न, शेतमालाचा भाव, बियाणांच्या, औषधांच्या व खतांच्या वाढलेल्या किमती, विद्यार्थ्यांचे चालू शैक्षणिक धोरणांमुळे जीवन उद्ध्वस्त होत आहे, तसेच फलटण-कोरेगाव विधानसभेच्या क्षेत्रात नवीन उद्योगधंदे व एमआयडीसी मंजूर करून आणणे तसेच मेडिकल कॉलेज व प्रशस्त सरकारी दवाखाना आणणे.  महिला, निराधार, अंध,अपंग, व्यक्तींच्या प्रगतीसाठी व संरक्षणासाठी ठोस उपाययोजना करण्यासाठी तसेच आणखीन ही या मतदारसंघात असंख्य प्रश्न आहेत त्यांना लवकरात लवकर सोडविण्यासाठी म्हणून मी ही माझी उमेदवारी घोषित करीत आहे. 

त्यामुळे फलटण-कोरेगाव मतदार संघातील तमाम मतदार बंधू-भगिनी, वरिष्ठ, ज्येष्ठ, सर्वच मतदारांना मी जाहीर आवाहन करते की, प्रत्येकाने आपले अनमोल एक मत मला देऊन विधानसभेत पाठवावे. मी वचन देते की, मी आपल्या मताचा मान ठेवून आपल्या मतदारसंघाचा विकास आपल्या सर्वांच्या साक्षीने व सोबतीने करूनच दाखवेन.

मी परत आपणा सर्वांना आवाहन करते की, आपले प्रत्येकी एक अमूल्य मत मला देणे म्हणजे फलटण-कोरेगाव विधानसभेच्या विकासाला मतदान देणे होय.

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment