News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

‘दोघंही नको; तिसराच बरा’ म्हणत प्रा.रमेश आढाव यांना मिळतोय उदंड प्रतिसाद : धनंजय महामुलकर

‘दोघंही नको; तिसराच बरा’ म्हणत प्रा.रमेश आढाव यांना मिळतोय उदंड प्रतिसाद : धनंजय महामुलकर




फलटण :       ‘‘फलटण - कोरेगांव विधानसभा मतदारसंघात उमेदवारांकडून प्रचाराने वेग घेतला असून संविधान समर्थन समिती पुरस्कृत स्वाभिमानी शेतकरी संघटना, स्वाभिमानी पक्ष व परिवर्तन महाशक्तीचे अधिकृत उमेदवार, ज्येष्ठ पत्रकार प्रा.रमेश आढाव यांनीही प्रचारात आघाडी घेतली आहे. मतदारांच्या गाठी घेत असताना मतदरांकडून त्यांना उदंड प्रतिसाद मिळताना दिसत असून ‘दोघंही नको; तिसराच बरा’ असं म्हणत मतदार यंदा प्रा.रमेश आढाव यांच्या रुपाने नवीन पर्याय निवडणार असल्याचे संकेत देत आहेत’’, अशी माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सातारा जिल्हाध्यक्ष धनंजय महामुलकर यांनी दिली. 

याबाबत सविस्तर बोलताना धनंजय महामुलकर म्हणाले, ‘‘स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी वेळोवेळी शेतकर्‍यांच्या हक्कासाठी आजवर अनेक आंदोलने उभारली आहेत. या आंदोलनातून शेतकर्‍यांना न्याय मिळाला आहे. ‘स्वाभिमानी’च्या या कार्याची जाण मतदारसंघातील शेतकरी वर्गामध्ये असल्याचे दिसून येत आहे. शिवाय आमचे उमेदवार प्रा.रमेश आढाव हे गेली अनेक वर्षे पत्रकारितेसारख्या पवित्र क्षेत्रात कार्यरत आहेत. सुशिक्षीत, मितभाषी, मतदारसंघातील सर्वप्रकारच्या प्रश्‍नांची जाण, प्रश्‍न सोडवण्याचे कौशल्य या सगळ्या आमदार म्हणून आवश्यक असलेल्या जमेच्या बाजू त्यांच्याकडे आहेत. पत्रकारितेबरोबरच केंद्र व राज्य सरकारच्या विविध समित्यांवर त्यांनी काम केले आहे. गुणवरे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून अल्प काळात त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे. प्रशासकीय कामे करुन घेण्याची हातोटी, समाजातील सर्व घटकांशी सलोख्याचे संबंध आणि दांडगा जनसंपर्क यामुळे प्रा.रमेश आढाव यांना मतदार नक्कीच आपली पसंती दर्शवतील’’, असा विश्‍वासही महामुलकर यांनी व्यक्त केला आहे.


परिवर्तन महाशक्ती विकास आघाडी चे उमेदवार प्रा. रमेश आढाव

‘‘मतदारसंघात प्रचारादरम्यान फिरत असताना मतदारसंघातील विचित्र राजकारणाला सर्वसामान्य मतदार कंटाळला असल्याचे बोलून दाखवत आहे. कुणाचाही मोहरा आमदार करण्यापेक्षा स्वत:चा स्वतंत्र चेहरा असलेला आमदार आम्हाला यंदा निवडून द्यायचा आहे. त्यासाठी प्रा.रमेश आढाव हे आमच्यासमोर उत्तम पर्याय असून आम्ही त्यांनाच विजयी करणार आहोत. मतदारसंघातील पारंपारिक राजकारणाला छेद देवून आम्हाला खर्‍या अर्थाने परिवर्तन घडवायचे आहे. असा सूर सूज्ञ मतदार व्यक्त करत आहेत. त्यामुळे येत्या २० तारखेला फलटण - कोरेगांव विधानसभा मतदारसंघात मतदार क्रांती घडवतील आणि २३ तारखेला प्रा.रमेश आढाव यांच्या रुपाने फलटणला नवीन नेतृत्त्व प्राप्त होईल’’, असा विश्‍वासही धनंजय महामुलकर यांनी व्यक्त केला आहे.

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment