निवडणूक कालावधीत ओपिनियन आणि एक्झिट पोलला प्रतिबंध
भारत निवडणूक आयोग |
सातारा, दि. 15 : भारत निवडणूक आयोगामार्फत विधानसभा निवडणूक २०२४ साठीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर आयोगाने निवडणूक कालावधीत निवडणूक अंदाज (ओपिनियन पोल तसेच एक्झिट पोल) दर्शविण्यावर प्रतिबंध केला आहे, अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली आहे.
भारत निवडणूक आयोगाच्या सुचनेनुसार सदर अधिसूचना महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात प्रकाशित करण्यात आली आहे. या नुसार राज्यात 13 नोव्हेंबर रोजी सकाळी सात वाजल्यापासून 20 नोव्हेंबर 2024 रोजी सायंकाळी 6.30 वाजेपर्यंतच्या कालावधीत एक्झिट पोल आयोजित करणे, त्यांचे कोणत्याही माध्यमातून प्रसारण करणे, एक्झिट पोलचे निकाल जाहीर करणे यावर प्रतिबंध राहील असे स्पष्ट केले आहे.
उमेदवारांकडून वृत्तपत्रांमध्ये देण्यात येणाऱ्या जाहिरातींचे पूर्व प्रमाणिकर करुन घेणे बंधनकार. उमेदवारांना मतदानाच्या आदल्या दिशवी म्हणजे 19 नाव्हेंबर व मतदानाच्या दिवशी म्हणजे 20 नोव्हेंबर 2024 रोजी वृत्तपत्रांमध्ये द्यावयाच्या जाहिरातींचे माध्यम प्रमाणिकरण व सनियंत्रण, जिल्हाधिकारी कार्यालय, सातारा यांच्याकडून पूर्व प्रमाणिकरण करुन घेणे बंधनकारक आहे.
माध्यम प्रमाणिकरण समितीकडे विहित नमुन्यातील अर्ज सादर करताना प्रत्येक नोंदणीकृत राष्ट्रीय किंवा राज्यस्तरीय राजकीय पक्ष व निवडणूक लढवणारा उमेदवार यांनी जाहिरात प्रसारित करण्याच्या प्रस्तावित दिनांकाच्या पूर्वी 3 दिवस आधी समितीकडे अर्ज करावा, असे निर्देशही जिल्हा निवडणूक अधिकारी श्री. डूडी यांनी दिले आहेत.
Post a Comment