प्रा.रमेश आढाव यांच्या प्रचारार्थ परिवर्तन महाशक्तीची दि.१७ रोजी जाहीर सभा
फलटण : संविधान समर्थन समिती, स्वाभिमानी शेतकरी संघटना, स्वाभिमानी पक्ष, प्रहार जनशक्ती पक्ष व परिवर्तन महाशक्तीचे फलटण - कोरेगांव विधानसभा मतदार संघातील अधिकृत उमेदवार प्रा.रमेश आढाव यांच्या प्रचारार्थ रविवार, दिनांक १७ नोव्हेंबर २०२४ रोजी शहरातील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक येथे दुपारी ३ वाजता जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले असून या सभेस स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख माजी खासदार राजू शेटी, स्वराज्य पक्षाचे प्रमुख श्रीमंत संभाजीराजे छत्रपती, प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख आमदार बच्चू कडू हे मार्गदर्शन करणार आहेत. परिवर्तन महाशक्तीचे घटक असलेले ऑल इंडिया रिपब्लिकन पक्षाचे दीपक केदार यांनाही या सभेस निमंत्रित करण्यात आले असून या सभेस फलटण - कोरेगांव विधानसभा मतदारसंघातील जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन संविधान समर्थन समिती व स्वाभिमानी पक्षाच्यावतीने पत्रकार परिषदेतून करण्यात आले आहे.
Post a Comment