फलटण नगरपालिकेने आठवडी बाजारातील बदल केले जाहीर
फलटण : १ जानेवारी २०२५
फलटण शहरातील महात्मा फुले चौक ते श्रीमंत मालोजीराजे पुतळा ते शासकीय अधिकार गृह ते केंजळे स्मारक ते गिरवी नाका या परिसरामध्ये दर रविवारी भरविण्यात येणारा आठवडा बाजार हा शहरातील मध्यवर्ती बाजारपेठ या ठिकाणी प्रायोगिक तत्त्वावर मागील रविवार पासून भरविण्यात येत आहे. सदर फलटण शहरातील मध्यवर्ती बाजार पेठ येथे भरविण्यात येणाऱ्या आठवडी बाजाराच्या नियोजनासाठी नगर पालिका कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तसेच वाहतूकीला कोणत्याही प्रकारचा अडथळा येऊ नये म्हणून नगरपालिका प्रशासन व पोलीस प्रशासन यांनी संयुक्तपणे नियोजन केलेले आहे.
खालील ठिकाणी आठवडा बाजार भरविण्यात येणार आहे.
१. गजानन चौक (मधुमालती इमारत) ते उमाजी नाईक चौक.
२. उमाजी नाईक चौक (ज्ञानेश्वर मंदिराच्या मागील बाजूस) ते डेक्कन चौक.
३. उमाजी नाईक चौक ते मेटकरी गल्ली.
४. मेटकरी गल्ली ते शिवशक्ती चौक (परिवार साडी सेंटर).
५. शिवशक्ती चौक ते अप्सरा साडी सेंटर (रविवार पेठ).
६. शिवशक्ती चौक ते नरसिंह चौक.
७. नरसिंह चौक ते शिवानी गिफ्ट हाउस.
खालील ठिकाणी आठवडा बाजार भरविण्यात येणार नाही
१. क्रांतिसिंह नाना पाटील चौक ते छत्रपती शिवाजी महराज चौक.
२. छत्रपती शिवाजी महाराज चौक ते बारामती चौक (उपजिल्हा रुग्णालय).
३. छत्रपती शिवाजी महराज चौक ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक.
४. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते महावीर चौक.
५. महावीर चौक ते उमाजी नाईक चौक (मुधोजी हायस्कूल समोर).
६. महावीर चौक ते डेक्कन चौक.
७. डेक्कन चौक ते महात्मा फुले चौक (लाईफ लाईन हॉस्पिटल समोर).
८. महात्मा फुले चौक ते गजानन चौक.
९. श्रीमंत मालोजीराजे पुतळा ते शासकीय अधिकारगृह.
१०. शासकीय अधिकारगृह ते गिरवी नाका.
११. फलटण शहरातील इतर उर्वरित ठिकाणे.
खालील ठिकाणी वाहने पार्किंग करण्याची सुविधा निशुल्क करण्यात आलेली आहे.
१. नगरपालिका प्रशासकीय इमारतीच्या समोरील वाहनतळ.
२. डेक्कन चौक येथील अशोका हॉटेल शेजारील नगरपालिका मालकीचे वाहनतळ.
फलटण शहरातील ज्या ठिकाणी आठवडा बाजार भरविण्यात येणार आहे ती सर्व ठिकाणे सर्व व्यापारी वर्ग, शेतकरी वर्ग व नागरिक यांच्या माहितीसाठी नमूद करण्यात आलेली आहेत.
उपरोक्त नमूद ज्या ठिकाणी आठवडा बाजार भरविण्यात येणार नाही अशा ठिकाणी बसल्याचे आढळून आल्यास सदर व्यापारी व शेतकरी यांचे विरुद्ध प्रशासनामार्फत उचित कारवाई करण्यात येईल.
उपरोक्त नमूद केलेल्या ठिकाणी दुचाकी, चारचाकी, सायकल तसेच इतर प्रकारची वाहने पार्किंग करण्याचे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात येत आहे.
तसेच सदर आठवडा बाजार हा प्रायोगिक तत्त्वावर शहरातील मध्यवर्ती बाजारपेठ या ठिकाणी मागील रविवार पासून भरविण्यात येत असल्यामुळे सर्व नागरिक, शेतकरी व व्यापारी यांनी प्रशासनास सहकार्य करावे. असे मुख्याधिकारी नगरपालिका फलटण यांनी प्रसिध्दी पत्रा द्वारे सांगितले आहे.
Post a Comment