अनुसूचित -जाती व अनुसूचित-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा अंमलबजावली संदर्भात एक दिवसीय तालुकास्तरीय कार्यशाळा आयोजन करण्याचे सर्व जिल्हाधिकारी यांना आदेश- श्री.वैभव गिते

पुणे दि.२३| नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टीस (NDMJ ) या संघटनेच्या वतीने पाठपुरावा केल्याने मा.आयुक्त समाज कल्याण, पुणे ओम प्रकाश बखोरिया यांनी ॲट्रॉसिटी ॲक्ट ची अंमलबजावणी होण्यासाठी जाणीव-जागृती शिबिरे तालुकास्तरीय घेण्यात यावेत या करिता राज्यातील सर्व जिल्हाधिकारी यांना आदेशित करण्यात आले आहे.
त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन प्रशिक्षण संस्था बाटीऀ, पुणे महासंचालक सुनील वारे यांनी देखील सर्व जिल्हाधिकारी यांना प्रत्येक तालुकास्तरावर ॲट्रॉसिटी ॲक्टची कार्यशाळा घेण्यासाठी तालुकानिहाय १०००० रुपये इतके अनुदान दिलेले आहे.
या कार्यशाळा ही शिबिरे येत्या चार दिवसांच्या आत घेऊन अहवाल समाज कल्याण आयुक्त पुणे, यांना पाठवणे उपविभागीय अधिकारी, प्रांताधिकारी, जिल्हाधिकारी, यांना बंधनकारक केलेले आहे.
त्यामुळे आपल्या उपविभागात तालुक्यात उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी त्यांच्या अंतर्गत असलेल्या उपविभागीय पोलिस अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, मंडल अधिकारी, तलाठी ,ग्रामसेवक, पोलीस पाटील, व संबंधित अधिकाऱ्यांची एकत्रित कार्यशाळांचे आयोजिन करणे हे बंधनकारक आहे.
त्यामुळे प्रत्येक तालुक्यात उपविभागामध्ये ही कार्यशाळा झाली आहे का? किंवा होणार आहे का? याबाबत चौकशी करणे व अंमलबजावणी करून घेणे हे गरजेचे आहे.