डॉ प्रसाद जोशी यांचेकडून भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीस अनोखी भेट वस्तू

फलटण येथील सुप्रसिद्ध अस्थीरोग तज्ञ डॉ प्रसाद जोशी यांनी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीच्या निमित्ताने स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी उपयोगी असणाऱ्या पुस्तकाचे दोन संच भेट म्हणून दिले, त्यांच्या या नावीन्यपूर्ण उपक्रमाचे सर्व बौद्ध बांधवांनकडून होत आहे कौतुक डॉ प्रसाद जोशी हे नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांना आपल्या लिखाणाच्या व लाईव व्हिडीओच्या माध्यमातून आरोग्या विषयची माहिती देत असतात.
परंतु आता त्यांनी या त्याच्या चांगल्या व वेगळ्या उपक्रमामुळे स्पर्धा परीक्षेची तयारी करत असणाऱ्या मुलांना खुप फायदा होणार आहे त्याच्या या उपक्रमातून अधिकारी घडविण्याचे काम होणार आहे.
डॉ प्रसाद जोशी यांच्या कडून पुस्तकांचा संच स्वीकारताना भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती समिती 2025 चे सदस्य, श्री गणेश भि. अहिवळे , श्री अजय का.काकडे ,श्री गोविंद प्र. काकडे , श्री सुरज वि. काकडे , श्री भूषण बनसोडे , श्री सिद्धार्थ र. अहिवळे, श्री चंद्रकांत म. मोहिते , श्री मंगेश प. सावंत , श्री कपिल नं. काकडे हे उपस्थित होते.