मा. श्री. सुनिल फुलारी विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र कोल्हापूर आज फलटण पोलीस ठाण्याच्या वार्षिक तपासणी निमित्त येणार

फलटण : सातारा जिल्हा पोलीस दलाची वर्षिक निरीक्षण तपासणी चालू असल्या कारणाने मा. श्री. सुनिल फुलारी विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र, फलटण पोलीस ठाण्यास व मा. उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या कार्यालयास भेट देणार आहेत मा. श्री. सुनिल फुलारी साहेब ( भा. पो. से. )यांना सलग दुसऱ्यांदा केंद्रीय गृह मंत्रालयाच्या वतीने उत्कृष्ट प्रशासकीय सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक प्रदान करण्यात आले आहे त्यानिमित्ताने आज दि. 11/03/2025 रोजी दुपारी 01:30 वाजता सजाई गार्डन जाधवाडी फलटण या ठिकाणी नागरी सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे, त्यावेळी ते नागरिकांशी थेट संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी समजून घेणार आहेत. या वेळी मा. श्री. समीर शेख पोलीस,अधीक्षक सातारा व मा. डॉ. वैशाली कडूकर, अप्पर पोलीस अधिकारी सातारा यांची विशेष उपस्थिती असणार आहे
मा. श्री. राहुल धस उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण उपविभाग यांनी नागरिकांना या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे अहवान केले आहे