“विद्यार्थ्यांमधील संशोधनाला वाव त्याचे कुटुंब, महाविद्यालय आणि परीसरातील निरीक्षणातूनच… डॉ. प्रशांत साठे”

पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे, अण्णासाहेब मगर महाविद्यालय येथे, शैक्षणिक व संशोधन समन्वय समितीच्या वतीने आयोजित आविष्कार संशोधन स्पर्धा या विषयी मार्गदर्शन करताना प्रमुख वक्ते डॉ. प्रशांत साठे यांनी वरील उद्गार काढले.
विद्यार्थ्यांमधील संशोधक वृत्तीस चालना मिळावी या हेतूने दरवर्षी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठा अंतर्गत महाविद्यालयीन,अंतर महाविद्यालयीन स्तरावर, अविष्कार रिसर्च स्पर्धेचे आयोजन करण्यात येत असते. त्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी
प्रा. डॉ. प्रशांत साठे, बीएमसीसी, पुणे, यांच्या मार्गदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी बोलताना डॉ. प्रशांत साठे यांनी विद्यार्थ्यांनी छोटे छोटे शैक्षणिक, सामाजिक, कौटुंबिक, पर्यावरणीय व नागरिक प्रश्न सोडविणे म्हणजेच अविष्कार स्पर्धेची तयारी होय असे सांगून विद्यार्थ्यांना संशोधन करण्यासाठी प्रोत्साहित केले
महाविद्यालयातील प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांनी संशोधनाचे महत्त्व अधोरेखित करून मुलांना संशोधनासाठी स्वतःच्या कल्पनाशक्तीचा कसा उपयोग करावा यावर मार्गदर्शन केले. महाविद्यालयीन स्तरावर अशा व्याख्यानांचे आयोजन केल्याने मुलांमध्ये संशोधनाविषयी आवड निर्माण होते व त्यांच्यात संशोधनाबद्दल सकारात्मक बदल होऊन उच्च शिक्षणाकडे विद्यार्थ्यांचा कल वाढवण्यासाठी या व्याख्यानाचे प्रायोजन केले होते, असेही त्यांनी सांगितले .
या प्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. शुभांगी औटी, डॉ. सविता कुलकर्णी, डॉ. लतेश निकम, डॉ. शुभांगी शिंदे प्रा. शैला धोत्रे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक डॉ. सुनिता दानाई- तांभाळे, सूत्रसंचालन सविता भुजबळ, पाहुण्यांची ओळख डॉ। सविता कुलकर्णी व आभार प्रदर्शन डॉ. लतेश निकम यांनी केले. या कार्यक्रमाचे आयोजन, शैक्षणिक व संशोधन समन्वयक समितीतील सर्व सभासद यांनी केले.