” शांताई उद्योग समूहाचे सर्वेसर्वा संतोष सस्ते (बापू) यांचा वाढदिवस संत गाडगेबाबा आश्रम शाळा खराडेवाडी येथे उत्साहात साजरा”

फलटण दि.१२| महाराष्ट्रात नावाजलेले शांताई उद्योग समूह या उद्योग समूहाचे सर्वेसर्वा तसेच सस्ते व्हेजिटेबलचे सर्वेसर्वा,निरगुडी गावचे व्यक्तीमत्व म्हणजे श्री.संतोष नारायण सस्ते (बापु) यांचा आज वाढदिवस संत गाडगेबाबा आश्रम शाळा खराडेवाडी या ठिकाणी साजरा करण्यात आला.
जन्मदिवस म्हटलं की एक वेगळा आनंद जो सर्वांसाठी असतो पण सर्व जण तो वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करतात मात्र संतोष बापु सारखी माणसांच दरवर्षी आनाथ आश्रमा मध्ये कुटुंब व मित्रांसमवेत साजरा करतात.यावेळी हि संत गाडगेबाबा अनाथाश्रम खाराडेवाडी या ठिकाणी उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी उपस्थित युवा नेते विकास सस्ते, युवा नेते महेश सस्ते, अमोल सस्ते,बबलू शेट बागवान, प्रगतशील शेतकरी राहुल सस्ते, अमोल बाळासो सस्ते, संतोष सावंत,गोपिशेट कांबळे, राजकुमार काकडे ( संपादक – लोकध्यास ) प्रशांत सोनवणे ( उपसंपादक – लोकध्यास )शुभम थोरात, शिंदे सर, जाधव महाराज, गोडसे सर,लावंड सर, उद्योजक गणेश सस्ते, तसेच कुटुंब व मित्र परिवार उपस्थित होते.