उपविभागीय दक्षता नियंत्रण समिती बैठक न झाल्याने फलटण प्रांत कार्यालयाच्या समोर १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी आमरण उपोषण करणार – वैभव गीते

फलटण : दि. 14 ऑगस्ट 2025
फलटण तालुक्यातील उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली गेले कित्येक दिवसा पासून अनुसूचित जाती जमाती अन्याय प्रतिबंधक कायद्याद्वारे दक्षता समिती स्थापन झालेली आहे.नियमानुसार सदर समितीची मीटिंग ही प्रत्येक महिन्याला घेणे अपेक्षित आहे.
परंतु गेल्या कित्येक महिन्यांपासून आज अखेर मासिक मीटिंग अजून घेण्यात आलेली नाही. या संदर्भात जिल्हाधिकारी सातारा यांना नॅशनल दलित मुव्हमेंट संघटना यांचे वतीने नुकतेच निवेदन देण्यात आले आहे.
निवेदनात असे म्हटले आहे की, फलटण तालुक्यात गेले कित्येक दिवसांपासून दलित समाजावर अन्याय अत्याचार होत असताना सुद्धा
या संदर्भात फलटण तालुक्यात अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या आधीन उपविभागीय दक्षता व नियंत्रण समितीची गेले 6 महिन्यापासून बैठक झालेली नाही.
जिल्हा अधिकारी यांच्या नियमाने मीटिंग प्रत्येक महिन्यात होणे बंधनकारक आहे. तरी ही मीटिंग घेतल्या जात नाहीत त्यामुळे फलटण तालुक्यात अनुसूचित जाती जमाती मधील लोकांनवर अन्याय अत्याचाराचे प्रमाण वाढलेले आहे वाढणा-या अत्याचारांमध्ये खून, महिलांची छेडछाड, जमिनीच्या अडचणी आदी गंभीर प्रकरणांचा समावेश असूनही, प्रांत कार्यालय हे जिल्हाधिकारी यांचे आदेशाचे पालन करत नाही. या परिस्थितीचा निषेध करीत वाढत चाललेल्या अन्यायावर उपायोजना, ठरविण्यासाठी समितीची बैठक घेणे अत्यंत आवश्यक आहे. समितीच्या बैठका न झाल्यामुळे फलटण तालुक्यामध्ये अनुसूचित जाती व जमाती वरती खूप अन्याय होताना दिसत आहे व हे असेच चालले तर या प्रवर्गातील लोकांना जगणे मुश्किल होईल हे लक्षात घेता १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी फलटण प्रांताधिकारी कार्यालयासमोर नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टीस संघटनेचे सचिव वैभवजी गीते यांनी आमरण उपोषण करण्याचा इशारा जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे दिला आहे.
या समितीची बैठक न घेण्यात येण्याने अनुसूचित जाती जमातींच्या हितासाठी असणारे कायदे प्रभावीपणे अंमलबजावणीत आणण्यात अडथळा निर्माण होतो आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी सातारा यांना अमित रणवरे, गोविंद मोरे, अमर चौगुले यांच्याद्वारे निवेदन देण्यात आले आहे.