शिक्षणाधिकारी विजयजी सरकटे यांनी सर्व शाळा व महाविद्याल्या मध्ये “घर घर संविधान “असा “संविधान अमृत महोत्सव “उपक्रम सुरू केला त्यांचा आदर्श इतरही शिक्षणाधिकाऱ्यांनी घेऊन “संविधान अमृत महोत्सव” साजरा करावा : वैभवजी गिते साहेब……

महाराष्ट्रात सर्वात पहिल्यांदा संविधान अमृत महोत्सव कल्याण डोंबिवली महानगरपालिकांच्या सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये साजरा करण्याचा निर्णय शिक्षणाधिकारी विजयजी सरकटे साहेबांनी 23/7/2025 रोजी घेतला आहे. फक्त निर्णय घेतला नाही तर या निर्णयाची अंमलबजावणी देखील कल्याण डोंबिवली महानगरपालिकांच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व सरकारी शाळांमध्ये व सर्व इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये संविधान अमृत महोत्सव निमित्त “चला संविधान समजून घेऊ” घर घर संविधान हे अभियान सुरू झाले आहे. यासाठी समितीचा स्थापना करूण परिणामकारक अंमलबजावणी आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या सर्व शाळांमध्ये हे संविधान अमृत महोत्सवाचे विविध कार्यक्रम शिक्षणाधिकारी विजयजी सरकटे साहेब स्वतः लक्ष घालून करून घेत आहेत. संविधानातील महत्त्वाच्या तरतुदी सोप्या भाषेमध्ये प्रत्येक शाळांना सांगून त्या विद्यार्थ्यांमध्ये रुजवण्याचा ऐतिहासिक कार्यक्रम विजयजी सरकटे साहेबांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने सुरू केलेला आहे आणि या उपक्रमास सर्व स्तरातून भरघोस प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे आम्ही नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टीस या संघटनेच्या वतीने राज्य महासचिव ऍड.डॉ. केवलजी ऊके यांच्या मार्गदर्शनामध्ये कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे शिक्षणाधिकारी विजयजी सरकटे साहेबांची भेट घेऊन त्यांचे व सर्व सहकाऱ्यांचे अभिनंदन केले. तसेच संविधान अमृत महोत्सवाच्या
कार्यक्रमासाठी मार्गदर्शन व पाठिंबा देणारे आयुक्त अभिनव गोयल कल्याण डोंबिवली महानगरपालिका यांचे देखील संघटनेच्या वतीने आभार मानले आहेत. कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या अंतर्गत शिक्षणाधिकारी विजयजी सरकटे यांनी सुरू केलेल्या संविधान अमृत महोत्सव या ऐतिहासिक कार्यक्रमाप्रमाणे महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमध्ये व महानगरपालिकांमध्ये हा असा कार्यक्रम राबविण्यासाठी इतर शिक्षणाधिकारी व महानगरपालिकांच्या आयुक्तांनी पुढे येऊन असे ऐतिहासिक कार्यक्रम राबवावेत अशी प्रतिक्रीया पत्रकारांशी बोलताना नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टिस या संघटनेचे राज्य सचिव वैभव गिते यांनी दिली. यावेळी शशी भाऊ खंडागळे, राहुल सावंत,भाऊराव तायडे हे उपस्थित होते.
महाराष्ट्र शासनाच्या वतीने व सर्व शाळा महाविद्यालयांच्या वतीने फक्त 26 नोव्हेंबर 2024 रोजी संविधान दिन साजरा करण्यात आला त्यानंतर संविधान अमृत महोत्सव असताना देखील कोणत्याही जिल्हाधिकारी व शिक्षणाधिकारी तसेच गटशिक्षणाधिकाऱ्यांनी, शाळा,महाविद्यालयांनी नित्यनीयमाने संविधान अमृत महोत्सव साजरा केला नाही.
संविधान दिवस व संविधान प्रास्ताविक वाचन सर्वात अगोदर
सनदी अधिकारी मा.ई.झेड खोब्रागडे साहेबांनी नागपूर येथे मुख्य कार्यकारी अधिकारी असताना साजरा केला होता. त्यानंतर
खोब्रागडे साहेब हे समाज कल्याणचे संचालक असताना संविधान दिवस साजरा करण्याचा शासन निर्णय काढण्यासाठी चा प्रस्ताव शासनास पाठवलेला होता त्यामुळेच शासनाने 24 नोव्हेंबर 2008 रोजी संविधान दिवस साजरा करण्याचा शासन निर्णय काढला होता.
त्यानंतर संविधानाला 75 वर्षे पूर्ण होत असल्याने संविधान अमृत महोत्सव साजरा करावा ही मागणी नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टिस या संघटनेने व ई.झेड.खोब्रागडे साहेबांच्या संविधान प्रतिष्ठान नागपूरच्या वतीने शासनाकडे सातत्याने लावून धरण्यात आली. त्यामुळे संविधान अमृत महोत्सव साजरा करण्याचा शासन निर्णय शासनास काढावा लागला परंतु 26 नोव्हेंबर 2024 च्या व्यतिरिक्त हा संविधान अमृत महोत्सव शासनाच्या वतीने कुठेही साजरा करण्यात आला नाही.