* फलटण नगरपरिषद प्रभाग रचने संदर्भात पहिली हरकत दाखल *

फलटण (प्रतिनिधी) – फलटण नगरपरिषद निवडणुकीसाठी जाहीर झालेल्या प्रारूप प्रभाग रचनेवर आज पहिली हरकत दाखल झाली आहे. ही हरकत प्रभाग क्र. २ मंगळवार पेठ , फलटण येथील मतदार कुणाल किशोर काकडे यांनी दाखल केली आहे.
काकडे यांनी आपल्या हरकतीत असे नमूद केले आहे की
१ ) दलित वस्ती सलग ठेवण्याऐवजी तुकडे करून असंबंधित भाग जोडले गेले आहेत.
२.प्रभागाची भौगोलिक सलगता भंगली असून नागरिकांना प्रशासनिक व निवडणुकीत अडचणी येणार आहेत.
३.अशा विभागणीमुळे SC Component Fund चा योग्य वापर होऊ शकत नाही व त्यामुळे दलीत वस्तीतील काही भाग हा विकासा पासून वंचित राहू शकतो
हे संविधानातील अनुच्छेद २४३T तसेच महाराष्ट्र नगरपालिका अधिनियमातील नियमांचे उल्लंघन आहे.
या हरकती सोबत काकडे यांनी पुराव्यासाठी नकाशा जोडला असून त्यात दलित वस्तीचे तुकडे व परकीय भागांचे जोड स्पष्ट दाखवले आहेत.
फलटण नगरपरिषदेत प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर दाखल झालेली ही पहिली हरकत असल्याने स्थानिक पातळीवर चर्चेला उधाण आले आहे.