सहकारच्या नावाखाली सावकारकी 

फलटण सहाय्याक निबंधक ऑफिस मधील प्रशासकीय अधिकारी व संस्था चालक म्हणजेच सहकार महर्षी या सर्वांच्या संगणमताने होत आहे सर्वसामान्यांची  फसवणूक , सहकार कायद्यामधील  कलम 101 नुसार पतसंस्थेच्या थकीत कर्जदाराच्या मालमतेचा जप्ती आदेश मिळवता येतो व त्यावर कब्बजा घेता येतो पण कुठल्या कर्जाचा व कुणाच्या विरोधात कशाच्या आधारावर जप्ती आदेश मिळविता येतो, या बद्दलची लोकांना माहिती नसल्यामुळे याचाच फायदा घेत कर्जदाराची बनावट कागदपतत्रे तयार करून त्याच्या आधारावरती 101 चा दाखला ( आदेश ) सहाय्यक निबंधक व  पतसंस्था चालक आर्थिक देवाण – घेवाण करून मंजूर करून घेतात व दुष्ट हेतू ठेवून कर्जदारची मालमत्ता ताब्यात  घेतली जाते अशी चर्चा आहे  संस्था चालकांना व सहाय्यक निबंधक ऑफिस मधील कर्मचाऱ्याना कुठल्यातरी मोठ्या अदृश शक्तीचा वरद हस्त मिळत असल्यामुळे ते या सर्व गोष्टी कुणालाहि न भिता करत आहेत असे फलटण शहर व फलटण तालुका पंचक्रोशीत लोकांच्यात सर्वत्र चर्चा आहे त्यामुळे सर्वसामान्य गोरगरीब लोकांन वरती आन्याय होत आहे यांच्या आन्यामुळे कित्येक कुटुंबातील प्रमुख एक ते दोन  व्यक्तीचा  यांच्या भीतीमुळे हर्ट -अटॅकने मृत्यू झालेला आहे याकडे  शासन व वरिष्ठ प्रशासन लक्ष घालेल कि नाही व आशा प्रशासकीय  अधिकारी व पतंस्थेच्या , चेरमन, व्हाईस चेरमन,, जनरल मॅनेजर,मॅनेजर  सहकार महर्षीच्या यांच्या मालमत्तेची व त्यांने केलेल्या घोट्याळ्याची  ED, CBI , Incom-Tax कडून चौकशी होईल काय ?     हे असेच चालत राहिले व यामध्ये लोकांना न्याय नाही मिळाला तर लोकांना याच्या कडून होणाऱ्या त्रासमुळे, अन्यामुळे पिडीताना आत्माहत्या केल्या शिवाय पर्याय उरणार नाही असा सूर पिडीत लोकांच्या मधून कानावर येत आहे, तरी आश्या बनावटी खोट्या नोटरीचा , खोट्या कागदपतत्राचा आधार घेऊन हे दुय्यम निबंधकाकडील  मॉर्गेजदस्त आहेत असे भासवून जप्ती आदेश मिळवून  त्यावर महसूल प्रशासना कडून  आश्या कोणत्याही बनावट कागदपत्रावरती मालमत्ता जप्ती प्रक्रिया केली तर यांच्या वरती फोजदारी गुन्हे दाखल झाले पाहिजेत व  पिडीत अनुसूचित जाती जमाती मधील असेल तर पतसंस्था चालक, व व्यवस्थापनाने खोट्या कागदपत्रावर खोटा दावा केला व लोकसेवकांने म्हणजे प्रशासकीय अधिकाऱ्यांने  कर्तव्यात कसूर केली म्हणून अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध )अधिनियम 1989 चा सुधारीत अधिनियम 2015 नुसार अट्रॉसिटचा गुन्हा दाखल झाला पाहिजे त्याशिवाय “सहकारच्या नावा खाली होणाऱ्या सावकारकीला “चपराक बसणार नाही व पीडिताना न्याय मिळणार नाही अशी  लोकांन मध्ये चर्चा होत आहे व सर्व सहकारा मधील संस्था चालकाची व प्रशाकीय अधिकाऱ्याची ED ,  C. B. I. व IN-COMTX कडून चौकशी झाली पाहिजे अशी अपेक्षा आहे.

सविस्तर वृत्तांता  साठी पुढील बातमी लोकध्यास साप्ताहिक, पोर्टल, व युट्युब चैनल वर पहा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!