जिल्हा उपनिबंधकाच्या मनमाणी कारभाराविरोधात शेतकरी संघटनेचे उपनिबंधक कार्यालय सातारा येथे धरणे आंदोलन…..!

     उपनिबंधक सहकारी संस्था सातारा कार्यालयाच्या मनमानी कारभाराविरोधात शेतकरी संघटने कडून धरणे आंदोलन करण्यात आले त्या आंदोलनामध्ये शेतकरी संघटने कडून सद्यस्थिती धरून काही मुद्दे मांडण्यात आले आहेत सहकाराला लागलेली कीड बंद  पडणाऱ्या सहकारी बँका पतसंस्था बँकांमधील संचालकांची गैर व्यवहार याबाबत चौकशी करावी ठेवीदारांच्या ठेवी बुडवलेल्या पतसंस्था व सहकारी बँका यांची चौकशी व्हावी कित्येक संस्थापकांची  व संचालकांच्या कोट्यावधी रुपयांची मालमत्ता उद्योग गोरगरीब कर्जदारांचे शोषण करताना दिसत आहेत अशा पतसंस्था व सहकारी बँकेची व त्यांच्या संचालक मंडळाची ईडी प्राप्तिकर खात्यामार्फत तात्काळ चौकशी करावी अशी मागणी करण्यात आली बेकायदेशीर निकाल निलाव प्रक्रियेवर व  निलाव केलेले तत्काळ रद्द करण्यात यावेत बोगस कागदपत्राच्या आधारावरती मिळवलेले जप्ती आदेश रद्द करण्यात यावेत पतसंस्था सहकारी बँका व सोसायट्यांकडून शेतकऱ्याची होत असणारी आर्थिक लूट थांबवण्याची मागणी करण्यात आली तसेच  मिळकतीवर करण्यात आलेली बेकायदेशीर निलाव जप्ती ची प्रक्रिया तत्काळ रद्द करण्यात यावेत सहकार खात्यातील संस्थाचालक व संचालक मंडळांनी केलेल्या भ्रष्टाचाराची ही जोरदार टीका करण्यात आली सहकारी बँका,पतसंस्थांच्या कामकाजाची कलम 83 88 व 89 अंतर्गत चौकशी व्हावी सर्व कर्ज प्रकरणांचे स्वतंत्र लेखापरीक्षण (टेस्ट ऑडिट )करण्यात यावे तसेच शेतजमिनीवर बोजा नोंद करण्याच्या प्रक्रियेतील गैरप्रकार थांबवावेत जिल्हा उपनिबंधक कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले तेव्हा जिल्हा उपनिबंधक संजय कुमार सुद्रिक व कराड सहकार उपनिबंधक अर्पणा यादव यांनी सर्व संघटना पदाधिकाऱ्यांना चर्चेला बोलावलेले यावेळी शेतकरी संघटनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी विविध संस्थांमध्ये कसे गैरव्यवहार घोटाळे व भ्रष्टाचार होतात लूट कशी होते व कर्जदाराची पिळवणूक करून मालमत्ता गिळंकृत कशा केल्या जातात सोसायटीचे सचिव कर्ज घेऊन माफ करून घेतात बेकायदेशीर लिलाव जप्ती होते यासंबंधीची उदाहरणे व दाखले दिले तात्काळ संबंधित कर्जदार व जामीनदार यांना ज्या  सहकारी बँका व पतसंस्था कर्जविषयक कर्ज अदा तारखेपासून  चालू तारखे अखेरची कर्जा संदर्भातील पूर्ण माहिती, ठेवीची माहिती कर्ज खाते उतारा पतसंस्था व सहकारी बँकेच्या कडून सही शिक्याची कागदपत्रे देत नसतील अशा संस्थांच्या विरोधात प्राप्त तक्रारी प्रमाणे तत्काळ कारवाई करण्यात यावी आर्थिक घोटाळे केलेल्या  सहकारी बँका,पतसंस्थांच्या ठेवीदारांना त्यांच्या ठेवी कधी मिळणार आर्थिक घोटाळे करणाऱ्या  संचालका विरोधात गुन्हे दाखल करणार का तसेच मुदत बाह्य कालबाह्य झालेल्या व ज्या वसुली दाखलेला 12 वर्षापेक्षा जास्त कालावधी झालेला आहे त्या सर्व कर्जदारांचे जामीनदाराची कर्ज माफ करून संचालक मंडळाच्या मालमत्तेतून कर्जाची वसुली करण्यात यावी बेकायदेशीर कर्जा मधून इमारत निधी प्रतिष्ठान वर्तमानपत्राच्या सभासद स्वयंरोजगाराकरिता कर्ज अदा करतेवेळी रक्कमा सक्तीने घेणाऱ्या संचालक मंडळाविरुद्ध गुन्हे दाखल करावेत त्याच्या प्रतिष्ठान व स्वयंरोजगार संस्थेची  तत्काळ सखोल चौकशी करावी प्राप्त तक्रारी प्रमाणे सर्व कर्जे प्रकरण यांचे स्वतंत्र लेखापरीक्षण ज्यादा तक्रारी असणाऱ्या संस्थांची सहकार कायद्याचे कलम 83 व 88 अन्वये सखोल चौकशी होऊन संचालक बोर्ड व दोषी पदाधिकाऱ्यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करावेत लाखो रुपयाच्या विनाकारण दिलेल्या कर्जाची वसुली संचालक मंडळाच्या मालमत्तेतून करण्यात यावी जिल्हातील सहकारी बँका व पतसंस्था बेकायदेशीर काम करणारे व स्वतःच्या मालमत्ता वाढवणारे संचालक मंडळ व विशेष वसुली अधिकारी यांच्याविरुद्ध काय व कोणती कारवाई करावी व कोणती कारवाई केली  यासंबंधी दहा दिवसाच्या आत पूर्ण माहिती द्यावी न मिळाल्यास दिनांक 7 एप्रिल रोजी पुन्हा शेतकरी संघटना व सर्व सामाजिक संस्था संघटना सातारा उपजिल्हा निबंध कार्यालयासमोर ठिय्या व धरणे आंदोलन करणार असल्याचा इशारा दिलेला आहे यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र बर्गे- पाटील, बैलगाडी शर्यत लढ्याचे नेते धन्यकुमार जाधव उर्फ (तात्या )सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत देशमुख जिल्हा संघटक अशोकराव पाटील शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजयराव पाटील,सामाजिक कार्यकर्ते रतन पाटील,रूपाली पोळ माजी सरपंच वसंतराव चव्हाण (नाना )आनंदराव थोरात कराड तालुका अध्यक्ष विनायक जाधव सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र घारे – पाटील बाबासाहेब पवार शिवरात्र संघटनेचे संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत पवार (भाऊ) बळीराजा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष उत्तमराव खबाले (आण्णा) सामाजिक कार्यकर्ते उद्देश माने सामाजिक कार्यकर्ते रामचंद्र येळे बापू एमके बाबर अपंग जनता दल जिल्हाध्यक्ष असलम आंबेकर आंबेकरी कालेकर तात्या पाटील माजी तालुका अध्यक्ष प्रवीण उतळे – पाटील सामाजिक कार्यकर्ते उद्देश माने सामाजिक कार्यकर्ते रामचंद्र येळवे ( बापू) एम के बाबर अपंग जनता दल जिल्हाध्यक्ष असलम आंबेकरी कालेकर ( तात्या) आदि सर्व संघटना व पदाधिकारी यांनी जिल्हा उपनिबंधक कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!