प्रशासनाच्या मदतीने रात्रीच्या अडून मुरूम माफियांचा उच्छाद, रात्रीच्या वेळी खुलेआम  मुरुम वाहतूक…..!


फलटण  (गिरवी ) : शोधवार्ता
       गिरवी परिसरात रात्रीच्या अंधाराचा गैरफायदा घेत मुरूम माफियांनी अक्षरशः धुमाकूळ घातल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. दररोज रात्रीच्या सुमारास डंपर आणि हायवा वाहनांचे ताफे उघडपणे मुरूम वाहतूक करताना दिसत असून, हा प्रकार दिवसेंदिवस बिनधास्तपणे वाढत आहे.विशेष म्हणजे, इतक्या मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या या वाहतुकीकडे महसूल आणि पोलीस प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याचे  दिसून येत आहे.कि असे भासवले जात आहे की या सर्वांची मिले भगत आहे. यामध्ये कोण होत आहे मालामाल मुरूम माफिया की प्रशासकीय अधिकारी  मुरुम वाहतूक करणारे एवढ्या जोरात भरधाव वेगाने  वाहन चालवताता की त्यांना कळतं नाही कि आपण लोकांच्या गर्दीतून जात आहोत की मोकळ्या रस्त्याने जात आहोत हे सुद्धा कळत नाही अशावेळी काही अनुचित प्रकार घडला तर त्याला कोण जबाबदार .“प्रशासन झोपेत आहे की जाणूनबुजून डोळेझाक करत आहे? असा थेट सवाल आता उपस्थित होत आहे.रात्रीच्या अंधारात सुरू असलेले हे उत्खनन नेमके कुठे ? आणि कोणाच्या परवानगीने चालू आहे, याबाबत स्पष्टता नसल्याने संशयाची सावट अधिक गडद झाली आहे. कायद्याचा उघड उघड भंग करून सुरू असलेल्या या प्रकारामुळे संशय आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. बेकायदेशीर मुरूम उत्खननाला कोणाचे प्रशासकीय पाठबळ ?महसूल विभाग आणि पोलीस नेमक काय करत आहेत? रात्रीचीच  वाहतूक का ? काय लपवले जात आहे? प्रशासनान यावर काय कारवाई करणार का?  बेकायदेशीर मुरूम उत्खनन नेमकं  रात्रीच्या अंधाराचा कुठे आणि कुणाच्या आशिर्वादाने सुरू आहे अशा चर्चांना उधाण आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!