फलटण शहर पोलिसांनी दुचाकी चोरट्यांना सापळा रचून  – दोन आरोपीना केले जेरबंद……


फलटण : शहरातील दुचाकी चोरीच्या वाढत्या घटनांवर अंकुश ठेवत फलटण शहर पोलिसांनी मोठी कारवाई करत दोन आरोपींना जेरबंद केले आहे. या आरोपींकडून चोरीस गेलेल्या दोन मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत.
फलटण येथील एस.टी. स्टॅण्डच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ पार्क केलेली सुमारे ६० हजार रुपये किमतीची लाल-काळ्या रंगाची होंडा शाईन (MH.11.BT.9490) मोटारसायकल १५ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११ ते दुपारी २ दरम्यान चोरीस गेली होती. याप्रकरणी तक्रारदार कृपाल श्रीपाल टाळकुटे (रा. रविवारपेठ, फलटण) यांनी दिलेल्या तक्रारीवरून फलटण शहर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याचा तपास सुरू असताना वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे संशयितांचा शोध घेतला. अखेर पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले. कसून चौकशीत त्यांनी फलटण येथील होंडा शाईन तसेच अकलूज (ता. माळशिरस) येथून स्प्लेंडर मोटारसायकल चोरी केल्याची कबुली दिली.
पोलिसांनी आरोपींकडून दोन्ही दुचाकी हस्तगत केल्या असून आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार संतोष नाळे करत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर व उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरविंद काळे व त्यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!