फलटण तालुक्यातील जिल्हा परिषद अंतर्गत दलित वस्ती सुधार योजनेतील झालेल्या कामांची चौकशी करून कारवाई करण्यात यावी अन्यथा पंचायत समिती समोर आंदोलनाचा महादेव गायकवाड यांचा इशारा फलटण तालुक्यातील जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या १३१ गावांमध्ये सन २०२१ ते २०२६ या कालावधीत जिल्हा परिषद सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत दलित सुधार योजनेमधून विविध विकासकामे करण्यात आलेली आहेत. सदर कामांपैकी अनेक कामे निकृष्ट दर्जाची झाल्याची तसेच अनेक ठिकाणी कामांमध्ये अनियमितता असल्याची व झाल्याची गंभीर बाब निदर्शनास येत आहे.सदर योजनेअंतर्गत शासनाकडून लाखो रुपयांचा निधी खर्च करण्यात आला असला तरी प्रत्यक्षात अनेक कामांची गुणवत्ता अत्यंत खालावलेली असून काही ठिकाणी कामे अपूर्ण, निकृष्ट दर्जाची अथवा नियमबाह्य पद्धतीने करण्यात आल्याच्या तक्रारी नागरिकांकडून होत आहेत. त्यामुळे शासनाच्या निधीचा मोठ्या प्रमाणात अपव्यय झाल्याची शंका निर्माण झाली आहे.तरी आपण फलटण तालुक्यातील सर्व १३१ गावांमध्ये दलित सुधार योजनेअंतर्गत सन २०२१ ते २०२६ या कालावधीत झालेल्या सर्व कामांची स्वतंत्र व सखोल चौकशी करावी. चौकशीदरम्यान संबंधित कामांची तांत्रिक तपासणी करून निधीचा वापर, कामांची गुणवत्ता व प्रशासकीय प्रक्रिया यांची पडताळणी करण्यात यावी.तसेच चौकशीत दोषी आढळणारे संबंधित सरपंच, ग्रामसेवक, संबंधित अधिकारी, अभियंते, ठेकेदार व इतर जबाबदार व्यक्तींवर फौजदारी स्वरूपाची तसेच प्रशासकीय कायदेशीर कारवाई करण्यात यावी. शासनाच्या निधीचा अपव्यय झाल्यास संबंधितांकडून रकमेची वसुली करण्यात यावी.या मागणीची तात्काळ दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करण्यात यावी. अन्यथा फलटण पंचायती समोर लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्यात येईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!