सह्याद्रीचा वाघ क्रांतिसिंह नाना पाटील यांना भीम आर्मी संघटने कडून विनम्र अभिवादन…

फलटण : 4 ऑगस्ट 2026

   ब्रिटिश राजवटीच्या कालखंडात साताऱ्याच्या भुमी मध्ये पत्रीसरकार स्थापण करून ब्रिटिशांची झोप उडवणारे क्रांतिसिंह नाना पाटील यांची आज ३ आॉगस्ट रोजी जयंती निमित्त भीम आर्मी संघटने कडून फलटण येथील मुख्य चौकातील पुर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार घालुन अभिवादन करण्यात आले व क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जीवन कार्याबदल मत व्यक्त करण्यात आले क्रांतिसिंह नाना पाटील हे लहान पणा पासून  देश प्रेमी होते लहान वया पासुनच परकीय सत्ते बाबत चीड असणारे नाना यांनी देश सेवे साठी तलाठी पदी असणाऱ्या नोकरीला राम राम ठोकला आणि स्वातंत्र्य  लढ्यात स्वतःला वाहुन घेतले  सातारा – सांगली भागातील सुमारे १५०० गावात प्रति/ पत्री सरकार स्थापण करूण ब्रिटिश सरकारला घाम फोडला, स्वातंत्र्य लढा आधिक मजबुत केला . लोकांच्या मनात देशा बदल प्रेम निर्माण केले त्यांच्या पाहाडी आवाजाने आणि प्रभावी भाषणाने . अनेक युवकांनी या स्वातंत्र्य लढ्यात सहभाग घेतला .                              

                  लोकांनी त्यांना पाटील ही पदवी दिली  शेतकर्‍यांनची ,कामगारांची, पिळवणूक करणार्‍या सावकारांना हि त्यांनी सोडले नाही त्यांना हि कडक शिक्षा केली . तर बहुजन समाजाच्या विकासा साठी हि मोठे योगदान दिले …पुढे तुफान सेनेची स्थापना करुन चळवळ आधीक प्रभावी केली असे स्वतंत्र्य सैनिक क्रांतिसिंह नाना पाटील  यांना संघटने कडून अभिवादन करण्यात आले.     “स्वातंञ सेनानी  पत्री सरकार क्रांतीसिंह नाना पाटील जयंती निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा. व त्यांच्या कार्यास विनम्र अभिवादन”
🙏🌹🌹🙏🌹🌹🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!