फलटण शहर व तालुक्यातील 2017 मधील  सहकारातील सावकार कोण ?

फलटण : दि. 27 एप्रिल 2026

           2017 मध्ये सावकारकीच्या प्रकरणाचे मोठे रॅकेट पकडण्यात आले होते. संपूर्ण सातारा जिल्ह्यामधील छोट्या-मोठ्या सावकारांना अर्थ पुरवठा करणाऱ्या सहकारातील सावकाराच्या त्याच वेळी नांग्या ठेचल्या असत्या तर पुन्हा फलटण तालुक्यामध्ये सावकार किने डोके वर काढले नसते. 2017 मधील सहकारातील सावकार, सातारा जिल्ह्यातील सावकारकीचे मुख्य  सूत्रधार पिता-पुत्र कोण ? 2017 मध्ये त्या सावकारांच्या नावाची चर्चा होत असतानाही त्यांना अटक का झाली नाही ? अशी सावकाराचे नाव न घेता कुजबुज होत आहे. ” हे लोकांना पडलेल मोठे कोडे आहे”.त्यांच्या डोक्यावरती आहे काय ? “राजकीय वरदहस्त “अशी चर्चा फलटण शहर व तालुक्यामध्ये दबक्या आवाजात होत आहे . आज मितीला हि फलटण तालुका व शहरांमध्ये 2017 प्रमाणेच घटना घडत आहे पूर्वीप्रमाणेच एका पिता-पुत्रांने फलटण तालुका व शहरांमधील लोकांचे आज ही जगणे केले आहे मुश्किल” हीच तर नाहीं ना ? 2017 मधील सावकारांना अर्थ पुरवठा करणारी जोडी “अशी चर्चा सर्व फलटण तालुका पंचक्रोशीत होत आहे.महसूल व पोलीस प्रशासनातील मोठ्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून गोरगरिबांची व सर्वसामान्यांची बेकायदेशीरपणे चालवली आहे लूट ? त्यांना कुठल्याहि कायद्याचा धाक राहिलेला नाही. बनावट कागदपत्रे तयार करून त्याच्या आधारावरती “गोरगरीब व सर्वसामान्यांची केली जात आहे लूट “त्यांनी तयार करून दिलेल्या कागदपत्राची न्यायिक तत्त्वाच्या बाजूने कुठलाही सहकारातील अधिकारी परीक्षण करताना दिसून येत नाही. सर्व आदेश बनावट कागदपत्रे असली तरी त्यांच्याच बाजूने दिले जातात.असे चित्र दिसत आहे. “कायदा व सुव्यवस्थेचे रक्षण” करतेच अन्यायकर्त्याच्याच वळचणीला बसलेले दिसून येत आहेत त्यामुळे न्याय मिळताना दिसत नाही. अन्यायकर्त्याच्याच सांगण्या प्रमाणे कायद्याची अंमलबजावणी करत असतानाचे चित्र दिसत आहे.  अन्यायकर्त्याच्या  विरोधात तक्रार नोंदवण्यास गेल्यानंतर  त्यांच्यावरती कसलीही कारवाई केली जात नाही. व त्यांच्यावरती गुन्हा दाखल करून घेण्याचे धाडस पोलीस प्रशासन दाखवत नाही.  उलट अन्यायकर्त्याच्या  विरोधात आवाज उठवणाऱ्या वरतीच गुन्हे दाखल करून कारवाई केली जाते. फलटण तालुक्यातील महसूल व पोलीस प्रशासनातील अधिकारी व सर्व कर्मचारी हे त्यानंच्या   “अवैद्य धंद्याचे रक्षण ” करते असल्यासारखे वागत आहेत. कुठलाही अधिकारी त्यांनी केलेल्या कुकर्माचे कायद्याच्या पद्धतीने परीक्षण करताना दिसत नाही ? उलट त्यांनाच दिले जात आहे लूट करण्यासाठी संरक्षण ? अन्याय कर्त्याच्या या कृत्यामुळे जर का फलटण तालुक्यामध्ये काही आत्महत्या चे प्रकार घडले तर नवल वाटण्या सारखे काहीच असणार नाही. अशा किती जरी घटना घडल्या तरी ही कुठल्याही प्रशासनाकडून त्यांचेवर कुणीच कायद्याचा बडगा उगरणार नाही कारण आज पर्यंत त्यांच्या विरोधात केलेल्या तक्रारी विरुद्ध त्यांच्यावरती कसलाच गुन्हा दाखल झालेला नाही अगदी एस पी ऑफिस सातारा असो,डी वाय एस पी ऑफिस फलटण असो किंवा शहर व ग्रामीण पोलीस स्टेशन फलटण असो हे कुणीच त्यांच्या विरोधात किती ही पुरावे दिले तरी तक्रार नोंदवून घेत नाहीत. त्यामुळे सर्वसामान्य गोरगरिबांना फलटण तालुक्यामध्ये व शहरात न्याय मिळणार नाही असे चित्र स्पष्ट दिसत आहे. दोन दिवसापूर्वीजी एक आत्महत्येची घटना घडली आहे. याला पोलीस प्रशासनच जबाबदार आहे.अशा घटना घडू नये म्हणून कुठलंही प्रशासन प्रमाणिकपणे काम करेल  असा विश्वास नागरिकांमध्ये राहिलेला नाही अशी चर्चा  फलटण  पंचक्रोशी मधील नागरिकांन मध्ये दबक्या आवाजात होत आहे .

            ( क्रमशः इति वृत्तांत पुढील बातमी मध्ये )                                                                           ( पुढील सविस्तर वृत्तांत वाचण्यासाठी पहा लोकध्यास पोर्टल वरील न्यूज व साप्ताहिक लोकध्यासच्या अंकामधील बातमी.)
  

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!