महाराष्ट्र पोलीस टाईम्स  व साप्ताहिक.भगवा प्रांतच्या  वर्धापन दिनी पत्रकार आप्पासाहेब तांबे यांचा सन्मान…..!!!


सोलापूर :

      सोलापूर येथे भव्य कार्यक्रम   विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती . महाराष्ट्र पोलीस टाईम्स व साप्ताहिक भगवा प्रांत यांच्या ५ व्या वर्धापन दिनानिमित्त मंगळवार दिनांक ७ एप्रिल २०२६ रोजी सोलापूर येथील निर्मलकुमार फडकुले सभागृहा या ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात प्रशासकीय अधिकारी, राजकीय क्षेत्रातील मान्यवर, शैक्षणिक क्षेत्रातील प्रतिनिधी तसेच पत्रकार बांधवांचा गौरव करण्यात आला.
या प्रसंगी फलटण येथील ज्येष्ठ पत्रकार आप्पासाहेब तांबे यांचा विशेष सन्मान करण्यात आला. त्यांच्या पत्रकारितेतील उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. समाजातील विविध प्रश्न मांडून जनतेचा आवाज बुलंद करणाऱ्या तांबे यांच्या कार्याचे यावेळी उपस्थितांनी कौतुक केले.
यावेळी उपस्थित अतुल कुलकर्णी (एस.पी. सोलापूर ग्रामिण),एम राजकुमार साहेब (पोलीस आयुक्त सोलापूर शहर)
राहुल देशपांडे (पोलिस निरीक्षक तालुक पोलिस स्टेशन),सायकर साहेब (डी.वाय.एस.पी. बार्शी), रविंद्रनाथ भंडारे (पोलिस निरिक्षक वाहतुक शाखा शहर),गजानन निरपगर (सोलापूर आर.टी.ओ.) संजय जगताप (वरिष्ठ पोलीस निरिक्षक एल.सी.बी. ग्रामीण), विनोद घुगे (पी.आय. सांगोला),महादेव राऊत साहेब (वरिष्ठ पोलीस निरिक्षक फौजदार चावडी),भाग्यश्री जाधव (राज्य उत्पानद शुल्क अधिक्षक, सोलापूर), सुरज मुलाणी (पोलीस निरिक्षक जोडभावी पेठ),निरज उबाळे (पोलीस निरिक्षक अकलुज), कुंदन गावडे (पोलीस निरिक्षक वैराग), दत्तात्रय बोरीगिड्डे (पी.आय. मंगळवेढा), प्रशांत रामचंद्र चौगुले (पोलीस उपाधिक्षक अँटीकरप्शन विभाग), सुधिर किडकर (डि.वाय.एस.पी. ट्रॅफिक विभाग),सागर दादा कत्ते (युवा उद्दोजक),भारत अमरसिंह मनसावाले (समाजसेवक सामाजिक कार्य),बाजीराव पोवार (पोलीस निरिक्षक मोहोळ),श्री. टी. शिवाय. मुजावर (पी.आय. पंढरपूर तालुका),रोहित उद्योग (ए.पी. माढा), विकास दिंडोरे (पी.आय. माळशिरस), विशाल वायकर(पी.आय. नातेपुते),शिवाजी राऊत (वरिष्ठ पोलीस निरिक्षक जेलरोड), महेश घोडके,पोलिस उपनिरीक्षक तालुक पोलिस स्टेशन आदी मान्यवर उपस्थित होते.मुख्य संपादक उमेश काळे यांनी उपस्थितांचे स्वागत व आभार व्यक्त केले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!