पॅ.भाईसाहेब जाधव यांची सामाजिक कार्यकर्ते व पत्रकारांशी फलटणच्या विविध विषयावरती चर्चा…..!

फलटण :दि. 17 एप्रिल 2026
दि. 16/04/2026 रोजी बहुजन युथ पॅन्थर चे राष्ट्रीय अध्यक्ष मा.भाईसाहेब जाधव यांनी फलटण येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्प हार घालून महापुरुषांच्या घोषणा देऊन विनम्र अभिवादन केले त्यानंतर सामाजिक चळवळीतील कार्यकर्ते व साप्ताहिक लोकध्यासचे संपादक यांच्याशी फलटण येथील सामाजिक, राजकीय स्थिती संदर्भात व अशा विविध विषयावरती चर्चा केली. व भविष्यात फलटण येथील दलित व बहुजन समाजावरती होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात जोमाने आवाज उठवून या समाजाला न्याय देण्याचे काम करू वेळप्रसंगी रस्त्यावर उतरून रस्त्यावरची लढाई लढण्याची तयारी ठेवू व पिडीताना न्याय देण्यासाठी मोठा लढा उभारू संविधानाने दिलेल्या प्रत्येक अधिकाराचा संविधानिक पद्धतीने न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करू समता स्वातंत्र्य व बंधुत्व ह्या बाबासाहेबांनी दिलेल्या मूलभूतमंत्राच्या आधारावरती लोकांना न्याय देण्याचे काम करू फलटण हे बहुजन व दलित चळवळीसाठी व अन्यायाच्या विरोधात पेटून उठणारे ठिकाण आहे फलटणच्या चळवळीचा इतिहास अखंड महाराष्ट्राला माहित आहे. फलटण ही महाराष्ट्र मध्ये होणाऱ्या दलित व बहुजनांच्या अन्यायाच्या विरोधात पेटून उठणारी धगधगती मशाल आहे. असे त्यांनी जमलेल्या असंख्य सामाजिक कार्यकर्त्यांते व पत्रकारांनशी बोलताना सांगितले यावेळी बहुजन युथ पॅन्थरच्या सुषमाताई शिंदे ( राष्ट्रीय महिला संघटक ),कामगार संघर्ष संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष महादेव(आप्पा ) गायकवाड , लोकमत चे प्रतिनिधी विकास शिंदे ( सर), लोकध्यास चे संपादक राजकुमार काकडे ,पोलीस टाइम्स चे प्रतिनिधी व क्राईम न्यूजचे संपादक आप्पासो तांबे , केंद्रीय मानवधिकार चे रणधीर भोसले, ऍड मनिष काकडे समर्थ 24 तास न्यूज चे संपादक गणेश भोईटे. सातारा 24 तास न्यूज चे,जुबेर कोतवाल वंचित बहुजन न्यूज चे उपसंपादक प्रफुल अहिवळे वंचित बहुजन आघाडीचे उमेश कांबळे बहुजन समाज पार्टीचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष प्रेम मोरे, सुहास काकडे,दिनेश कांबळे भिम आर्मी चे अजित मोरे सचिन माने,फिरोज शेख रोहित अहिवळे हे उपस्थित होते या सर्व बहुजन सामाजिक संघटना व पत्रकार बांधवानी निळी शाल व भारतीय संविधान उद्देशिका आणि महापुरुषाची पुस्तकं देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.तसेच लोकध्यास या वृत्त पत्राच्या महात्मा ज्योतिबा फुले व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती विशेष अंकाचे प्रकाशन पॅन्थर भाईसाहेब जाधव यांच्या हस्ते करण्यात आले.



