उपसभापतीच्या गावातील काम अपूर्ण असतानाच ‘काम पूर्णचे बोर्ड’   “कलरच्या कामात नेमका चुना कोणाला लावला ” ? निरगुडीतील कामावर संशयाची सावट….!!!



फलटण : दि. 27 मे 2026                                                                          सातारा जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग फलटण यांच्या अंतर्गत पंचायत समिती सेस फंड २०२५-२६ मधून निरगुडी येथील होलार समाज मंदिर व बौद्ध समाज मंदिर सुधारणा काम सुरू असताना संबंधित ठेकेदाराने काम पूर्ण झाल्याचे बोर्ड लावल्याने संशायाची सावट निर्माण झाली आहे. बौध्द समाज या ठिकाणी लावण्यात आलेल्या बोर्डानुसार दोन लाख रुपयांच्या निधीतून समाजमंदिर सुधारणा काम मंजूर करण्यात आले असून काम सुरू दिनांक २० मार्च २०२६ तर काम पूर्ण दिनांक ३० मार्च २०२६ असा उल्लेख करण्यात आला आहे. तसेच दोष व दायित्व कालावधी एक वर्ष असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.
मात्र प्रत्यक्ष पाहणीमध्ये बौद्ध समाज मंदिराचे रंगकाम अद्याप पूर्ण असल्याचे दिसून येत नाही  होलार समाज मंदिर येथे केवळ फरशी बसविण्याचे काम करण्यात आल्याची चर्चा सुरू आहे. असे असताना संबंधित ठेकेदाराने काम पूर्ण झाल्याचा बोर्ड लावल्यामुळे कामाच्या दर्जाबाबत व प्रशासकीय देखरेखीबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.“काम अपूर्ण असताना दोष दायित्व कालावधीचा बोर्ड कसा लावला गेला?”, “काम पूर्ण दाखविण्याची एवढी घाई कशासाठी?” असे प्रश्न ग्रामस्थांकडून उपस्थित केले जात आहेत. विशेषतः होलार समाज मंदिर रंगकाम सुरू असतानाच काम पूर्ण दाखविण्याचा प्रयत्न झाल्याने संबंधित विभागाने या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी होत आहे.दरम्यान, “कलरच्या कामात नेमका चुना कोणाला लावला ”? अशा उपरोधिक चर्चांनाही गावात उधाण आले असून पंचायत समिती व बांधकाम विभागाने या कामाची पाहणी करावी अशी चर्चा होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!