जातीवादी PI अरविंद काळे यांच्यावर ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करा…..!

फलटण :
फलटण:”युद्ध नको, बुद्ध पाहिजे” असा शांततेचा संदेश देणाऱ्या बुद्ध जयंतीच्या मिरवणुकीला फलटणमध्ये गालबोट लागल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. फलटणचे पोलीस निरीक्षक स्वतःला शिस्तप्रिय समजतात, मात्र त्यांच्याच कार्यकाळात शहरात अवैध धंद्यांनी सीमा ओलांडली असून, संविधान मानणाऱ्या जयंती उत्सवात त्यांनी जाणीवपूर्वक अडथळा आणला आहे. याच्या पाठीमागे कुठल्या राजकीय शक्तीचा हात आहे काय ?
शहरात सध्या मटका, गुटखा, गांजा जुगार सावकार की आणि अवैध दारू विक्री राजरोसपणे सुरू आहे. या काळ्या बाजारावर पोलीस प्रशासनाचे कोणतेही नियंत्रण राहिलेले नाही. सामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्याऐवजी पोलीस प्रशासन केवळ कागदोपत्री शिस्त दाखवत असल्याचा संताप नागरिकांकडून व्यक्त होत आहे. “अवैध धंद्यांवर कारवाई करण्याचे धाडस न दाखवणारे पोलीस निरीक्षक शांततापूर्ण मार्गाने निघणाऱ्या भीम जयंती आणि बुद्ध जयंतीच्या मिरवणुकीत मात्र खोडा घालत आहेत असा संताप अनेक संघटनेच्या व आंबेडकरी विचाराच्या पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
आजवर अनेक अधिकारी फलटणमध्ये आले आणि गेले, मात्र कोणीही बुद्ध जयंतीची मिरवणूक अडवण्याचा प्रयत्न केला नव्हता. संविधानिक मूल्यांचे पालन करणाऱ्या या जयंती उत्सवात पोलीस निरीक्षक काळे यांनी घेतलेली भूमिका ही संशयास्पद असून, त्यांच्या पाठीमागे नेमके कोणाचे पाठबळ आहे, याची सखोल चौकशी व्हावी आणि त्यांच्या कॉल रेकॉर्डची तपासणी करण्यात यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
या सर्व प्रकारामुळे संतप्त झालेल्या सामाजिक,राजकीय व संघटनाचे कार्यकर्ते व पदाधिकारीनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.
पोलीस निरीक्षक काळे यांची तात्काळ बदली करून त्यांच्यावर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदेशीर कारवाई करावी.
तालुक्यातील अवैध धंदे मटका, दारू, जुगार,चक्री,गांजा,गुटखा सावकार की त्वरित बंद करावेत.
(पुढील बातमीमध्ये वाचा सहकारातील सावकार व त्यांना मदत करणारे महसूल प्रशासन व पोलीस प्रशासन )
पुढील खास बातमीसाठी वाचा सा.लोकध्यास,लोकध्यास पोर्टल, लोकध्यास ई पेपर ,लोकद्यास युट्युब चॅनेल



