योगीराज हे संत चरित्र म्हणजे आनंदाची अनुभूती : हभप सुरेश महाराज सुळ




फलटण :

सद्गुरू योगीराज गुणानाथ महाराज यांच्या २०६ व्या समाधी सोहळ्या निमित्त त्यांच्या चंदना सारख्या कार्याची त्यांच्या गुणांची व सामर्थ्याची यथार्थ गाथा योगीराज या चरित्र ग्रंथातून मोठ्या अभ्यासातून व परिश्रमातून संत साहित्यिक रवींद्र वेदपाठक यांनी मांडली आहे संत चरित्रांनी समाजाला दिशा मिळते संत साहित्य म्हणजे आनंदाची अनुभूती असते असे प्रतिपादन ह.भ.प.सुरेश महाराज सुळ यांनी पिंपळवाडी ता फलटण येथे योगीराज या संत चरित्राचे प्रकाशन करताना सांगितले

या कार्यक्रमासजेष्ठ साहित्यिक सुरेश शिंदे  साहित्यिक संपतराव टेंबरे प्रा अब्दागिरे  ,  साहित्यिक विकास ,सातारा जिल्हा बँकेचे व्यवस्थापक प्रकाश पुरी , हजारो भाविकांच्या, मान्यवरांच्या उपस्थितीत अत्यंत धार्मिक वातावरणात पुस्तक प्रकाशन सोहळा पार पडला.

यावेळी बोलताना सुळ महाराज पुढे म्हणाले
भारतीय समाजात संतांचे एक वेगळे स्थान आहे महाराष्ट्रात तर संतांची मोठी परंपरा आहे संत या शब्दाचा अर्थ सत या शब्दापासून आलेला आहे सत् या शब्दाचा अर्थ सतत, जे कालही होते, आजही आहेत, आणि उद्याही राहणार असे, विविध संतांनी वर्णन केल्याप्रमाणे संत आपल्या ज्ञानाने, आपणास आत्मज्ञानाचे दरवाजे खुले करतात


अध्यात्मिक क्षेत्र पिंपळवाडी, तालुका फलटण जिल्हा सातारा येथील श्री योगीराज गुणानाथ साधु महाराज यांच्या २०६ व्या संजीवन समाधी सोहळा व  श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा  अखंड हरिनाम सप्ताह संपन्न झाला यावेळी

समाधी सोहळ्याचे औचित्य साधून, श्री रवींद्र परशुराम वेदपाठक यांनी संपूर्ण माहिती घेऊन, विविध संतांचे चरित्रे वाचून लिहिलेल्या, श्री. योगीराज गुणानाथ महाराज चरित्र, अध्यात्मिक लेख, संतांच्या निवडक अभंगावरील निरूपण असलेले  “योगीराज” या पुस्तकाचे प्रकाशन ह.भ.प. सुरेश महाराज सूळ,ह.भ.प. श्री प्रकाश पवार महाराज, व ज्येष्ठ साहित्यिक श्री सुरेश शिंदे, यांच्या शुभहस्ते झाले,

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!