*लायन्स क्लब ऑफ फलटण गोल्डनतर्फे नूतन अध्यक्ष पदग्रहण सोहळा दिमाखात *

फलटण (दि.१८ ऑगस्ट): लायन्स क्लब ऑफ फलटण गोल्डनचा नूतन अध्यक्ष पदग्रहण सोहळा प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, कोळकी येथे उत्साहात व दिमाखात पार पडला. सामाजिक, शैक्षणिक व पत्रकारितेतील मान्यवरांच्या उपस्थितीने हा सोहळा संस्मरणीय ठरला.
या सोहळ्याला PMJF ला. भोजराज नाईक-निंबाळकर (डिस्ट्रिक्ट गव्हर्नर 2023-24) , ला. सुहास निकम (डिस्ट्रिक्ट चेअरमन, मिशन 1.9) , ज्येष्ठ पत्रकार अरविंदभाई मेहता, ला. महेश साळुंखे, माजी अध्यक्षा ला स्वाती चोरमले, ला. रणजित निंबाळकर, ला. चंद्रकांत कदम, ला. मनुभाई पटेल, श्री. विकास गायकवाड तसेच सरस्वती शिक्षण संस्था अध्यक्ष श्री. प्रदीप माने व कोषाध्यक्षा सौ. सविता माने , पत्रकार सागर चव्हाण यांसह अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली.
नूतन कार्यकारिणीचा शपथविधी ला. भोजराज नाईक निंबाळकर व
ला. सुहास निकम यांच्या हस्ते पार पडला. अध्यक्षपदी ला. संध्या गायकवाड, सचिवपदी ला. उज्वला निंबाळकर व खजिनदारपदी ला. सुनिता कदम यांनी पदभार स्वीकारला. या वेळी PMJF ला. भोजराज निंबाळकर यांनी समाजोपयोगी व नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेण्याचे आवाहन केले.याचबरोबर कार्यकारिणी मधील प्रत्येक सदस्याच्या कार्याचे स्वरूप व जबाबदारी सांगितली. तसेच आपल्या मनोगतात शुभेच्छा देताना ज्येष्ठ पत्रकार अरविंदभाई मेहता यांनी लायन्स क्लबच्या गेल्या कित्येक वर्षाच्या कार्याचा आढावा सांगून जुन्या मालोजीराजे साहेबांच्या कारकीर्दीपासून फलटण संस्थानच्या व लायन्स क्लबच्या सेवाकार्यासंबंधी माहिती दिली. त्यामुळे नवीन सदस्यांना कार्याबद्दल आणखी आपुलकी निर्माण झाली व नवीन सकारात्मक ऊर्जा व दिशा मिळाल्याची जाणीव झाली. आज लायन्स क्लब इंटरननॅशनलचे फलटणला मुधोजी लायन्स आय हॉस्पिटलच्या माध्यमातून ज्या ज्या सुविधा प्राप्त झाल्या आहेत व इतरही ठिकाणी गार्डन, मधुमेह उपचार केंद्र, युवकांसाठी कार्य, पर्यावरणाच्या बाबतीत असणारी सजगता व वृक्षारोपण अशा विविध गोष्टींची कार्ये मेहता सर यांनी सांगितली. आपल्या अध्यक्षिय मनोगतात ला.संध्या गायकवाड यांनी आपल्या सहकारी मैत्रिणीच्या समवेत लायन्स चे हे सेवाभावी कार्य मनापासून करु सर्व क्षेत्रात उत्तम कामगिरी करण्याची ग्वाही दिली.विशेषता अंधत्व निवारण,भुकबळी, पर्यावरण जागृती, कॅन्सर, मधुमेह, नैसर्गिक आपत्ती निवारण, युवकांसाठी प्रेरणादायी कार्य, विविध गोष्टींवर अभ्यास पुर्ण कार्य करण्याचा मानस व्यक्त केला. माजी अध्यक्षा स्वाती चोरमले यांनी आपल्या कार्यकाळाचा आढावा घेत नूतन पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या.
विशेष सत्कार समारंभ
सोहळ्यात मास्टर ओजस उमेश निंबाळकर याचा NEET परीक्षेत मिळालेल्या यशाबद्दल गौरव झाला. श्री. सचिन माने यांचा लॉकडाऊन काळातील सामाजिक कार्य व नॅशनल आयकॉन अवॉर्डबद्दल सन्मान झाला आणि अभिजीत एंटरप्राईजेसच्या यशस्वी उद्योजकतेबद्दल विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अहिल्या कवितके यांनी केले. प्रास्ताविक ला. सीता जगताप यांनी केले, तर आभारप्रदर्शन ला. निलम देशमुख यांनी मानले.
लायन्स क्लब ऑफ फलटण गोल्डनच्या नव्या कार्यकारिणीने सामाजिक, शैक्षणिक , आरोग्यविषयक, पर्यावरण जागृती , नैसर्गिक आपत्ती निवारण, युवती व युवकांसाठी विविध उपक्रम राबवण्याचा संकल्प व्यक्त केला. या सोहळ्यास लायन्स क्लबचे सदस्य व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.