सरपंच सौ . नंदाताई मोरे यांच्या हस्ते सरडे गावात विविध ठिकाणी केले ध्वजारोहण.

 क्रांतिसिंह नाना पाटील हायस्कूल सरडे येथे ७७ वा स्वातंत्र्य दिन  ध्वजारोहण नवनियुक्त सरपंच सौ नंदाताई मोरे व आदिनाथ वायफळकर यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

फलटण | सरडे :  युथ असोसिएशन संस्था सरडे चे क्रांतिसिंह नाना पाटील हायस्कूल सरडे ता फलटण येथे ७७ वा स्वातंत्र्य दिन सरडे गावाच्या सरपंच सौ . नंदाताई मोरे व श्री . आदिनाथ वायफळकर यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या वेळी भारत स्काऊट गाईड , मंथन स्पर्धेत ‘गांधी फाउंडेशन ‘ तालुका जिल्हास्तरीय ‘विभागीय राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत प्राविण्य मिळवलेल्या सरडे गावातील सर्व खेळाडूंचे  सत्कार करण्यात आले.तसेच प्लास्टिक मुक्त शाळा अभियानांतर्गत टेलर्स ऑर्गनायझेशन संस्था पुणे येथील श्री लोकेश बापट यांच्या माध्यमातून  क्रांतिसिंह नाना पाटील हायस्कूल येथे 200 स्टीलच्या बाटल्या देण्यात आल्या त्याचे विशेष आभार मानण्यात आले.

    यावेळी  उपस्थित युथ असो . अध्यक्ष – श्री . शत्रुघ्न बेलदार माजी अध्यक्ष श्री विठ्ठलदादा बेलदार स्कुल कमिटीचे अध्यक्ष श्री . संभाजी बेलदार श्रीहरी पाटील ,मुख्याध्यापक – श्री .भरत गरगडे ,श्री . अनिल खलाटे, श्री यशंवत देवकाते , श्री दादासो एजगर . क्रीडाशिक्षक श्री . आप्पासाहेब वाघमोडे श्री श्रीकांत पाटील सौ . शुभागी शिंदे सौ . शोभा भापकर ‘ सौ . पारीजातक जगताप मोरे शिक्षकेत्तर कर्मचारी श्री . अमोल जाधव श्री .संतोष भोईटे ,तसेच सरडे गावचे ग्रामस्थ  लखन बनसोडे रिपब्लिकन जनशक्ती पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष  ,हरिश्चंद्र करडे ,अमित धायगुडे ‘माझी पोलीस अधिकारी श्री संपतराव भोसले  ,विशाल मोरे ‘शरद आवटे वसंत गोफणे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

 सरपंच सौ . नंदाताई मोरे यांच्या हस्ते सरडे गावात विविध ठिकाणी केले ध्वजारोहण.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!