कठीण परिस्थितीवर मात करत विशाल जगताप यांची बँकिंग क्षेत्रात गगन भरारी.

विडणी गावचे सुपुत्र विशाल जगताप यांची अतिशय कठीण परिस्थितीवर मात करून  IBPS मार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये  स्पेशालिस्ट ऑफिसर म्हणून पंजाब नॅशनल बँकेत असिस्टंट मॅनेजर, स्केल-१ अधिकारी पदी निवड झाल्याबद्दल त्यांचे खूप खूप अभिनंदन.
     त्यांच्या सत्कार समारंभ वेळी मुलाखतीदरम्यान सांगितले की त्यांचे प्राथमिक शिक्षण हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा विडणी येथून झाले व १० वी पर्यंतचे शिक्षण उत्तरेश्वर हायस्कूल, विडणी येथून झाले तशी परिस्थिती खूप बेताची तरी सुद्धा शिकायची इच्छा म्हणून पुढे मुधोजी महाविद्यालय, फलटण येथे ऍडमिशन घेतले. एसटी बस साठी जाण्यासाठी ७ रु आणि येण्यासाठी ७ रु असे १४ रू लागायचे पण परिस्थिती खूप हालाखीची असल्यामुळे ५ रु ही हातात मिळायची पंचायत असायची मग असाच सकाळच्या वेळी गावातून जाणाऱ्या गाड्यांना हात करून शिक्षण पूर्ण करत राहिलो. नंतर B.B.A पूर्ण केलं ते झाल्यावर खूप मोठा प्रश्न म्हणजे कुठेतरी नोकरी मिळवायची आणि घराची परिस्थिती चांगली करायची फलटण मधे एका कंपनी मधे नोकरी लागली पण तिथे ही मला वाटेल तसा पगार नव्हता आणि रात्री ८-९ वाजेपर्यंत काम करून घेत असे पण नोकरी तरी सोडायची कशी तरी ही नोकरी करत राहिलो नंतर मी नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला आणि ठरवलं की आता इथून पुढे आपण स्पर्धा परीक्षा द्यायची मग बँकिंग क्षेत्रात उतरलो. फलटण चे प्रसिद्ध क्लासेस म्हणजेच सह्याद्री बँकिंग क्लासेस या ठिकाणी क्लास लावला तिथून पुढे परीक्षा देत राहिलो पण एका पण परिक्षेमधे यश आले नाही परीक्षेला पुण्याला जाण्याचा खर्च हा परवडणारा नव्हता म्हणून विचार केला आपण काय तरी काम बघायचं आणि अभ्यास पण करायचा, कारण घरची परिस्थिती खूप हलाखीची होत चालली होती त्यातून ही आई मला दुसऱ्याच्या रानामध्ये खुरपण करून पैसे दयायची नंतर मीच निर्णय घेतला की आपण जर गावामध्ये क्लासेस घेतले तर गावातील मुलांचं पण कल्याण होईल त्यांना स्पर्धा परीक्षा काय असते ते पण कळेल आणि आपल्याला काही पैसे पण मिळतील त्या अनुषंगाने “विशाल सर अकॅडमी” ची स्थापना केली आणि अँकॅडमी एवढी गाजली की मला विशाल सर म्हणून ओळख मिळाली नंतर पैशाची पण उणीव भासली नाही आणि मुलांना ही शिक्षण मिळालं. पण त्यात इकडे माझा अभ्यास कमी झाला. त्यादरम्यान तब्बल 29 परीक्षा मी नापास झालो आता अस वाटल की आपण काय करू शकत नाही क्लास च घेऊ, पण म्हणतो ना की “जो स्पर्धा परीक्षा करतो त्याला त्याच व्यसन असतं” तसंच मी ही ते व्यसन सोडलं नाही शेवटी म्हणतात ना नशिबाला पण झुकाव लागतं आणि तसंच काहीस १ एप्रिल २०२४ रोजी सकाळी १० च्या सुमारास घडल निकाल लागला आणि माझी IBPS मार्फत घेण्यात आलेल्या स्पेशालिस्ट ऑफिसर म्हणून पंजाब नॅशनल बँक मधे scale 1 अधिकारी पदी निवड झाली.
मुलाखतीचा प्रश्न होता की तुम्ही या यशाचे श्रेय कोणाला द्याल तेव्हा ते म्हणाले , मी माझ्या यशाचं श्रेय माझे गुरू भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना देतो आणि नंतर आई-वडिलांना तसेच माझ्या शिक्षकांना व माझ्या संपर्कातील सगळे लहान- थोर मित्र, विद्यार्थी यांना देतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!