फलटण तालुक्यातील ग्रामीण भागात ८६१ रुपयाचा गॅस सिलेंडर विकला जातोय ८८० ते ९०० रुपयांना

फलटण : प्रशांत सोनवणे
फलटण दि.२७| एकीकडे महागाईने नागरिकांची कंबरटे मोडले असताना तसेच घरगुती गॅस वाढ झाल्याने नागरिक त्रस्त आहे त्यातच फलटण तालुक्यातील ग्रामीण भागातील गॅस एजन्सी धारकांकडून ग्राहकांची लूट होत आहे यामध्ये भारत गॅस व एचपी गॅस या एजन्सींकडून गॅस सिलेंडरच्या टाकीसाठी ज्यादा पैसे मोजावे लागत आहे. घरगुती गॅस सिलेंडर घरपोच ८६१ रुपये किंमत असून देखील हे गॅस एजन्सी वाले नागरिकांकडून सिलेंडरच्या टाकीसाठी २० ते ४० रुपये ज्यादा घेतले जातात. तसेच फलटण तालुक्यातील सीएससी केंद्र मार्फत गॅस सिलेंडरचा पुरवठा केला जातो असे सीएससी धारक ९०० रुपयांना गॅस सिलेंडर विकला जात आहे. त्याचबरोबर जेव्हा कधी कधी ग्राहक गॅस एजन्सीच्या गोदामावर / कार्यालयात जाऊन स्वतः पैसे देऊन भरलेला सिलेंडर घेऊन जातात.अशा वेळी ग्राहकांना गॅस सिलेंडरच्या एकूण किंमतीमध्ये वाहतूक खर्च वजा केला पाहिजे. म्हणजेच( कॅश अँड कॅरी) १५ रूपये वाहतूक सवलत मूल्य म्हणून कमी घेतले पाहिजेत. पण असं न होता आहे या किंमतीत सिलेंडर विक्री केली जात आहे. याकडे फलटण प्रशासनाने तत्काळ लक्ष देऊन भारत गॅस व एचपी गॅस यांच्यावर जादा पैसे आकारल्यास तात्काळ कारवाई ची मागणी गोरं गरीब जनतेतून होत आहे.