भारतीय पत्रकार संघाच्या वतीने आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना फलटण येथे अभिवादन !!!!!

फलटण येथील बाळशास्त्री जांभेकर विद्यालयात मराठी पत्रकार दिन व ‘दर्पणकार’ आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती भारतीय पत्रकार संघाच्या वतीने उत्साहात साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमाप्रसंगी भारतीय पत्रकार संघाचे उपजिल्हा अध्यक्ष विकास शिंदे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यावेळी ते म्हणाले की, मराठी पत्रकारितेची पायाभरणी करणारे दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे योगदान अतुलनीय असून त्यांच्या विचारांचा आजच्या पत्रकारितेला मोठा आधार आहे. तसेच आदरणीय रविंद्र बेडकिहाळ सर यांनी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जीवनकार्यावर मोठ्या प्रमाणावर अभ्यासपूर्ण लिखाण केल्याचेही त्यांनी नमूद केले.
यावेळी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमास भारतीय पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष संदीप जाधव, उपजिल्हा अध्यक्ष विकास शिंदे, जिल्हा कार्याध्यक्ष राजाभाऊ बोंद्रे, जिल्हा हल्ला कृती समिती प्रमुख, आप्पासाहेब तांबे, फलटण तालुका अध्यक्ष राजकुमार काकडे, तालुका उपाध्यक्ष प्रशांत आहिवळे, सचिव अमोल पवार, सहसचिव गणेश भोईटे, संघटक प्रशांत सोनवणे, जुबेर कोतवाल, सुहास इतराज, नरेश सस्ते,मुख्याध्यापक भिवा जगताप सर, अरुण खरात सर यांच्यासह विद्यालयातील सर्व शिक्षक वर्ग उपस्थित होता.



