!!! फलटण पोलिसांची बुलेट राजांवर कारवाई !!! 60500/- ( साठ हजार पाचशे रु. ) रुपयांचा दंड वसूल…..

फलटण : दि. 26 फेब्रु. 2026
फलटण शहर पोलीस स्टेशनकडून फलटण शहरात मोठया व कर्कश आवाजात फिरणा-या मोटार सायकली व विनाकारण वेगात चालविण्या-या मोटार सायकल यांच्यावर विशेष मोहिम राबविण्यात आली. सदर मोहिमे अंतर्गत फलटण शहर पोलीस ठाणेकडुन एकुण ६ बुलेट व १ यामाहा अशा मोटार सायकल ताब्यात घेत धडक कारवाई केली.
त्या मोटार सायकल बुलेट या मॉडीफाय केलेले सायलेन्सर बसविण्यात आलेले होते. व १ यामाहा गाडी मॉडीफाय करण्यात आलेली होती. सदर गाडयावर प्रभावी कारवाई व्हावी या करिता मा. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, फलटण यांना त्या मोटार सायकलवर कारवाई करण्याकरिता अहवाल पाठविण्यात आला. त्या अहवालाच्या अनुशंगाने मा. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, फलटण यांनी सदर मोटार सायकलची तपासणी करुन घेवुन मोटार सायकल चालक व मालक यांना एकुण 55,500 /- ( पंचावन्न हजार पाचशे रुपये ) दंड आकरण्यात आलेला आहे.
तसेच बुलेट मोटार सायकलचे सायलेन्सर काढुन घेण्यात आलेले आहेत. फलटण शहर पोलीस ठाण्याकडुन सदर मोटार सायकल यांचेवर मोटार वाहन कायदयाअन्वये प्रलंबित असलेला 5000 /- ( पाच हजार रुपये ) दंड देखील वसुल करण्यात आलेला आहे. असा एकुण 60500 /- (साठ हजार पाचशे रुपये ) दंड वसुल करण्यात आलेला आहे.
अशा प्रकाराची फलटण शहर पोलीस ठाणे हद्दीमध्ये मोठया व कर्कश आवाजात फिरणा-या मोटार सायकली व विनाकारण वेगात चालविण्या-या मोटार सायकल स्वार तसेच गाडी मालकांवर सातत्याने कारवाई सुरु राहणार आहे.
या कारवाईत फलटण पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक अरविंद काळे, फौजदार एस. एस. शिंदे, पी.बी. धायगुडे, आर.डी. खरात, .एस.बी. जगताप, .एस.एस. परिहार यांनी सहभाग घेतला.



