फलटण पंचायत समिती लिपिक कर्मचाऱ्यांचे विविध सेवा विषयक मागण्यासाठी धरणे आंदोलन… राज्यस्तरावर संप करा येथे बसायचे नाही : – याशनी नागराजन

फलटण : दि. 25 फेब्रुवारी 2026
महाराष्ट्र जिल्हा परिषदेतील लिपिक कर्मचाऱ्यांच्या वेतन त्रुटी व वेतन सुधारणा मागणी सह पदोन्नती चे स्तर कमी करणे व जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसह विविध सेवा विषयक मागण्यांसाठी फलटण पंचायत समितीतील सर्व लिपिक कर्मचाऱ्यांनी दि २५ फेब्रुवारी पासून कामबंद धरणे आंदोलन सुरू केले आहे
यावेळी सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी फलटण पंचायत समिती मध्ये मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत आढावा बैठकी साठी उपस्थित होत्या लिपिक कर्मचारी यांनी वरील मागण्यांचे निवेदन त्यांना दिले आहे यावर याशनी नागराजन यांनी माध्यमांशी बोलण्यास नकार दिला
फलटण पंचायत समिती च्या जुन्या इमारती शेजारी लिपिक कर्मचारी यांनी एकत्र बसत कामबंद धरणे आंदोलन सुरू ठेवले होते यावर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी आंदोलक कर्मचाऱ्यांना या ठिकाणी बसू नका इथून बाहेर बसा अश्या म्हणाल्या
आंदोलक कर्मचाऱ्यांचे कोणतेही म्हणणे ऐकून न घेताच त्यांच्या आंदोलना संदर्भातील विषयांवर कुठलीही विस्तृत चर्चा न करता नागराजन मॅडम आढावा बैठकी साठी गेल्या त्यामुळे आंदोलक कर्मचारी यांनी संतप्त होत घोषणाबाजी केली. काही वेळासाठी तणाव निर्माण झाला होता त्यानंतर लिपिक कर्मचारी यांनी फलटण पंचायत समितीच्या प्रवेशद्वारावर आंदोलन सुरू ठेवले आहे
जिल्हा परिषद लिपिक वर्गीय कर्मचाऱ्यांचे वेतन त्रुटी व वेतन सुधारणा तसेच पदोन्नती स्तर कमी करण्याच्या संदर्भात जय महाराष्ट्र संघटनेने राज्यस्तरीय आंदोलन सुरू केले आहे त्या अनुषंगाने दिनांक 23 फेब्रुवारीपासून महाराष्ट्रातील पंचायत समिती व जिल्हा परिषदेतील सर्व लिपिक संपावर गेले असून सदर संपाबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात यावा असे निवेदन सहभागी कर्मचाऱ्यांनी माननीय गटविकास अधिकारी सातारा यांना दिले आहे



