!!!!!  फलटणचा झाला बिहार !!!!!    पोलीस प्रशासन आहे का ? याला जबाबदार ?

फलटण :दि. 24 फेब्रु. 2026

फलटण शहरांमध्ये रविवार दि. 22 फेब्रुवारी 2026 रोजी रात्री नऊच्या सुमारास शंकर मार्केट या गजबजलेल्या परिसरात  भरधाव वेगाने गाडी चालवणाऱ्या टोळक्याला  रात्रीच्या वेळी गाडी वेगात चालू नका असे सांगितले च्या रागातून अनिल विठ्ठल हिरणवाळे व संतोष हिरणवाळे (रा. ब्राह्मण गल्ली शंकर मार्केट फलटण ) या दोघा भावांवर  सत्तुर आणि लाकडी दांडक्याने जीवघेणा हल्ला झाला यातील दोनच गुन्हेगार पोलीस यंत्रणे कडून अटक करण्यात  आलेले असतानाच व या झालेल्या मारहाणीच्या घटनेला दोन दिवस होत नाही तोपर्यंतच लगेच दोन दिवसाच्या नंतर आज मंगळवार दिनांक 24 फेब्रुवारी 2026 रोजी  पुन्हा फलटण शहरातील व्यापाऱ्यावर दहशत, गुंडगिरी व धुमाकूळ माजवण्याचा व मारहाण करण्याचा आज दुसऱ्या दिवशीही प्रयत्न झाल्यामुळे पोलिसांच्या  कर्तुत्वावर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झालेले चित्र दिसून येत आहे  रविवार पेठ येथील ” हिंदुस्थान हार्डवेअर ” चे मालक श्री पटेल बंधूंना विनाकारण दहशत निर्माण करून मारहाण करण्यात आल्याची घटना घडली या सलग घडलेल्या प्रकारामुळे शहरातील व्यापारी वर्गामध्ये भीतीचे  वातावरण निर्माण झालेले दिसून येत आहे या सर्व प्रकारामुळे फलटण शहरांमध्ये सर्व व्यापारी व नागरिकांन मध्ये संताप व्यक्त केला जात आहे. 

       शहरामध्ये राजरोसपणे अवैध धंद्याचा नंगा नाच  चालू आहे फलटण शहरातील व तालुक्यातील तरुण पिढी व्यसनाधीन व चंगळवादी होताना दिसून येत आहे जुगार, चक्री, मटका व दारू या अवैध धंद्यामुळे तरुण पिढीचे आयुष्य बरबाद झालेले दिसून येत आहे याकडे सातत्याने पोलीस प्रशासन कानाडोळा करताना दिसून येत आहे खुलेआम चौका चौकामध्ये अवैद्य धंद्यांचे गुत्ते चालताना दिसून येत आहेत या सर्व धंद्यांना पोलीस प्रशासना कडून च मिळतोय का ? अभय कि याचा गोड फादर दुसराच कोणी ? याचे कोडे फलटणकरणांना काही केल्याविना सुटेना ? या सर्व धंद्याविना शहर व तालुका घेईल का ? मोकळा श्वास फलटण शहर व तालुक्या मध्ये या सर्व गोष्टींची चर्चा लोकांन मध्ये सुरू आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!