फलटण पंचायत समिती सभापती व उपसभापती निवडणुकीचा निवडणूक निर्णय अधिकारी बदला अशी शिवसेनेची मागणी…….

फलटण : दि. 11 मार्च 2026
फलटण पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती पदाच्या निवडणुकी साठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रियांका आंबेकर यांना दिलेली नियुक्ती रद्द करावी व दुसऱ्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नियुक्ती करावीअशी मागणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव यांनी जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केलेली आहे. यावेळी शिवसेनेचे जिल्हा समन्वयक विराज खराडे हे ही उपस्थित होते.
फलटण पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती निवडीसाठी सोमवार दिनांक 16 मार्च 2026 रोजी पंचायत समिती फलटण येथे निवडणूक घेण्यात येणार आहे या निवडीसाठी उपविभागीय अधिकारी प्रियंका आंबेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे मात्र शिवसेनेला,आंबेकर यांची नियुक्ती मान्य नाही जिल्हाधिकाऱ्यांनी या ठिकाणी दुसऱ्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्याची नियुक्ती करावी अशी मागणी करण्यात आली आहे. यामुळे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरणात चर्चेला उधाण आलेले दिसून येत आहे.



