जागतिक दिव्यांग दिनानिमित्त दिव्यांग बांधवांना मुख्याधिकारी निखिल मोरे यांनी दिल्या शुभेच्छा
फलटण – ३ डिसेंबर २०२४ रोजी जागतिक दिव्यांग दिनानिमित्त फलटण नगरपरिषदेकडून फलटण शहरातील पात्र दिव्यांग लाभार्थी यांना राखीव दिव्यांग कल्याण निधी वितरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. सदर कार्यक्रमात नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मा. श्री निखिल मोरे सर यांनी दिव्यांग बांधवांना संबोधित करताना प्रथमतः सर्व दिव्यांग बांधवांना जागतिक दिव्यांग दिनाच्या शुभेच्छा दिल्या व त्यानंतर नगरपरिषदेकडून दिव्यांग पात्र लाभार्थी यांना राखीव निधी मधून पहिल्या हप्त्याची रक्कम थेट लाभार्थी यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार असल्याबाबत तसेच शासन स्तरावरून वेळोवेळी प्राप्त होणाऱ्या सूचना व मार्गदर्शनानुसार निश्चित कार्यवाही नगरपरिषदेकडून करणेत येईल असे सांगितले.
फलटण नगरपरिषदेचे कार्यालय अधीक्षक श्री. रोहित जमदाडे यांनी नगरपरिषद मार्फत दरवर्षी राखीव दिव्यांग कल्याण निधी मधून २ टप्प्यामध्ये नगरपरिषदेकडून फलटण शहरातील पात्र दिव्यांग लाभार्थी यांना निधी वितरीत केला जात असून त्यामधील यावर्षीचा पहिला हप्ता जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य साधून एकूण १९८ पात्र दिव्यांग लाभार्थी यांना त्यांच्या बँक खात्यात थेट जमा करण्यात येणार आहे असे सांगितले.
यावेळी दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष श्री. सुभाष गायकवाड यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सुरुवातीला सर्व दिव्यांग बांधवांना जागतिक दिव्यांग दिनाच्या शुभेच्छा दिल्या व पात्र दिव्यांग लाभार्थी यांना निधी वितरीत केला जाणार असल्यामुळे कार्यक्रमास उपस्थित नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मा.श्री निखिल मोरे सर यांचे संघटनेच्या वतीने आभार व्यक्त केले.
तसेच कार्यक्रमास नगरपरिषदेचे उपमुख्याधिकारी श्री तेजस पाटील, दिव्यांग कामकाज विभागाच्या लिपिक सौ. काजल शिंदे, आस्थापना विभागाचे लिपिक श्री संतोष घाडगे उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार श्री मुश्ताक महात (निवडणूक व जनगणना विभाग) यांनी व्यक्त केले.