एसटी बसखाली सापडून दुचाकीस्वाराचा आगीत होरपळून मृत्यू

सातारा : भुईंज, ता. वाई हद्दीमध्ये असणार्‍या विरंगुळा हॉटेलसमोर आज सायंकाळी झालेल्या अपघातामध्ये एक दुचाकीस्वार बसखाली आल्याने व त्यानंतर लागलेल्या आगीमध्ये होरपळून मृत झाल्याची दुर्दैवी घटना घडल्याने एकच खळबळ उडाली असून या अपघातामुळे महामार्गावर मोठी गर्दी झाली होती. यामुळे काहीकाळ महामार्गावरील वाहतूकही बाधित झाली होती.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, त्र्यंबकेश्‍वर हून पलूस कडे जात असणार्‍या एमएच 40- एक्यू- 6303 या प्रवासी बसखाली भुईंज, ता. वाई हद्दीमध्ये असणार्‍या विरंगुळा हॉटेलसमोर एक दुचाकीस्वार चिरडला गेला. यावेळी बसला अचानक आग लागली आणि या आगीमध्येच संबंधित दुचाकीस्वाराचा होरपळून मृत्यू झाला. अपघातानंतर एसटी बसमधून प्रवास करणार्‍या प्रवाशांना त्वरित खाली उतरवल्यामुळे मोठा अनर्थ टळला. अपघातानंतर घटनास्थळी तात्काळ अग्नीशामक दलाचे बंब पोहोचल्यानंतर ही आग विझवण्यात आली.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!