भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती फलटण यांचे कौतुकास्पद उपक्रम

फलटण दि. 2 एप्रिल – समाज व्यवस्थेने आज महापुरुषांना जाती -जाती व धर्मा -धर्मामध्ये ऐका विशिष्ट चौकटीत जकडून ठेवले आहे खरेतर महापुरुषांनी केलेल्या विविध सामाजिक कार्यातून आपणाला बरेच काही शिकण्यासारखे आहे त्यामुळे महापुरुष व त्याचे विचार विशिष्ट चौकटीत व मर्यादित न राहता ते सर्वांन पर्यंत पोहचले पाहिजेत व सर्वांना समजले पाहिजेत यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती 2025 यांनी 1 एप्रिल पासून दररोज ऐका महापुरुषांना अभिवादन करून सर्व महापुरुषाच्या विचारांची पुस्तकं वितरित करण्याचे एक वेगळे कार्य हाती घेतले आहे. याच कार्यास अनुसरून आज छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन करून विविध महापुरुषांच्या विचारांच्या पुस्तकांचे वितरण शिवप्रतिष्ठान फलटण आणि मोती चौक तालीम शिवजयंती महोत्सव फलटण यातील पदाधिकाऱ्यांना करण्यात आले. यावेळी जयंती महोत्सव समिती मधील गणेश अहिवळे,अजय काकडे, गोविंद काकडे,सुरज काकडे,सिद्धार्थ अहिवळे,भूषण बनसोडे चंद्रकांत मोहिते,मंगेश सावंत,कपिल काकडे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते