निरगुडी गावात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०५ वी जयंती उत्साहात साजरी…..

.
प्रशांत सोनवणे
फलटण ( निरगुडी ) दि. 1 😐 साहित्यसम्राट, लोकशाहीर आणि श्रमिकांच्या आवाजाचे धारदार अस्त्र ठरलेले अण्णाभाऊ साठे यांची १०५ वी जयंती दि. १ ऑगस्ट २०२५ रोजी मोठ्या उत्साहात निरगुडी गावात साजरी झाली.
यावेळी छत्रपती शिवाजी महाराज,राजे उमाजी नाईक, राजमाता आहील्यादेवी होळकर, महात्मा जोतिबा फुले,भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली.यावेळी प्रमुख आकर्षण श्री दत्त साउंड फलटणवाला,मोरया डेकोरेशन ठरले.
यावेळी उपस्थित माजी सरपंच राजेंद्र सस्ते, जालिंदर सस्ते, चंद्रकांत सस्ते, युवा उद्योजक गणेश सस्ते, युवा नेते युवराज सस्ते, अमोल सस्ते, महावीर बनसोडे, धनंजय लकडे, सचिन खोमणे, महेश गायकवाड, महेंद्र गोरे, बाळासाहेब सोनवणे, प्रदीप खुडे, वैभव लोंढे, राजेंद्र खुडे, दादा खवळे,संदीप खवळे,सागर खवळे, तसेच निरगुडी येथील सर्व समाज बांधव व ग्रामस्थ उपस्थित होते.