” भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याच्या वतीने वर्षावास प्रवचन मालिकेचे पाचवे पुष्प मौजे विडणी समतानगर या ठिकाणी गुंफण्यात आले “

भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याच्या वतीने वर्षावास प्रवचन मालिकेचे पाचवे पुष्प मौजे विडणी समतानगर या ठिकाणी गुंफण्यात आले विषय बौद्धांचे मंगल दिन आणि मंगल सण या विषयावर प्रवचन देणारे प्रवचनकार म्हणून लाभलेले आयु चंद्रकांत मोहिते सर यांनी बौद्धांचे मंगल दिना विषय माहिती देताना सांगितले की इ. स. पुर्वी 563साली ज्या भगवान गौतम बुद्धांचा जन्म लुबिनी वनामध्ये एका शालवॣक्षाच्या खाली झाला आणि तेव्हा पासून आपल्या मंगल दिनाची व मंगल सणाची सुरुवात झाली आणि महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्माने तर जीवनच फुलुन गेले असे बारा महिन्यांच्या बारा पौर्णिमा यालाच मंगल दिन आणि मंगल सण असं बौद्धांच्या सणाची माहिती देताना पुढे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म दिन म्हणजेच 14 एप्रिल 1जानेवारी भिमा कोरेगाव 20मार्च महाडचा सत्याग्रह तसेच त्याग मुर्ती माता रमाई यांचा जन्म दिन 14 आकटोबर धम्म दिक्षा दिन सम्राट अशोकाने धम्म चक्र गतिमान केलेला दिवस असे अनेक प्रकारचे मंगल दिन व मंगल सणाची माहिती देताना बौद्धांनी हे प्रत्येक दिवस साजरे केले पाहिजेत असे समाजप्रबोधनाच्या माध्यमातून समाजाला सांगितले अशा प्रकारे पाचवे पुष्प भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याच्या वतीने समता नगर या ठिकाणी गुंफण्यात आले यावेळी उपस्थितांना सुरुवातीलाच भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याचे अध्यक्ष आयु. महावीर भालेराव सर यांनी भगवान गौतम बुद्धांनी सांगितलेली मंगल मैत्री दिनाच्या निमित्ताने उपस्थितांना व तालुक्याच्या पदाधिकारी यांना आणि केंद्रीय असिस्टंट स्टाफ ऑफिसर आयुष्यमान दादासाहेब भोसले साहेब यांना मैत्री दिनाच्या शुभेच्छा देऊन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली सुत्रसंचलन तालुक्याचे प्रचार पर्यटन विभागाचे उपाध्यक्ष आयु रामचंद्र मोरे सर यांनी केले. तसेच कार्यक्रमाला उपस्थित असणारे आमचे फलटण तालुक्याचे मार्गदर्शक गुरुवर्य आयु दादासाहेब भोसले साहेब असिस्टंट स्टाफ ऑफिसर सातारा व पुणे जिल्हा प्रभारी व केंद्राचे संघटक म्हणून उपस्थित होते तसेच फलटण तालुका महासचिव आयु बाबासाहेब जगताप सर कोषाध्यक्ष आयु विठ्ठल निकाळजे सर संस्कार सचिव आयु बजरंग गायकवाड सर उपस्थित होते कार्यक्रम सुंदर पद्धतीने साजरा झाला आणि शेवटी उपस्थितांचे आभार आयु रामचंद्र मोरे सर यांनी व्यक्त केले आणि जाता जाता संविधान उदेशिका देऊन सुंदर पद्धतीने वर्षावास मालिकेचे पाचवे पुष्प गुंफण्यात आले. जय भिम जय संविधान