अनुसूचित जाती -जमाती दक्षता समिती वरती माजी नगरसेविका वैशालीताई अहिवळे यांची निवड

फलटण :
फलटण तालुक्यात अनुसूचित जाती जमाती दक्षता समितीची स्थापना करण्यात आली व या समितीच्या माध्यमातून अनुसूचित जाती-जमातीच्या लोकांवरती होणाऱ्या अन्याया बाबत विस्तृत चर्चा करण्यात आली असून फलटण तालुक्यातील अनुसूचित जाती जमातीच्या लोकांच्या वर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात आवाज उठवून अन्याय कर्त्यांवरती अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा अधिनियम 1989 अंतर्गत गुन्हा दाखल करून पीडितास न्याय मिळवून देणे हाच उद्देश या समितीचा असेल अशा प्रकारची चर्चा झाली त्या समितीमध्ये अनुसूचित जाती जमातीतील सामाजिक कार्यकर्त्यांची निवड करण्यात आली ही बैठक फलटण येथील तहसील कार्यालयातील दालनात संपन्न झाली. या समिती वरती फलटण कोरेगाव मतदार संघाचे आमदार सचिन कांबळे पाटील, माजी नगरसेविका वैशालीताई अहिवळे,माजी नगरसेवक सचिन अहिवळे व समाज सेवक सनी काकडे यांची निवड करण्यात आली.