फलटण उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचारासाठी अत्याधुनिक उपकरणे व डॉक्टर उपलब्ध व्हावेत….

फलटण :
फलटण तालुक्यातील 70 ते 80 गावा मधील गोर गरीब नागरिक हि फलटण उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचारासाठी येत असतात कारण की फलटण शहरातील खाजगी रुग्णालयामधील उपचाराची फी त्यांना त्यांच्या आर्थिक परिस्थितीमुळे परवडत नाही परंतु फलटण मधील उपजिल्हा रुग्णालयामध्ये सोनोग्राफी , सिटीस्कॅन ,एमआरआय, यासाठी लागणारी उपकरणे उपलब्ध नाहीत रक्त लघवीच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या चाचण्यां होत नाहीत म्हणजे अत्याधुनिक लॅब उपलब्ध नाहीत कित्येक आजारा वरील औषधे व एमडी, एम एस, अर्थो स्पेशलिस्ट डॉक्टर ही उपलब्ध नाहीत या सर्व गोष्टी उपलब्ध नसल्यामुळे महिला लहान मुले ज्येष्ठ नागरिक व इतर पीडित यांच्यावरती योग्य उपचार होत नाहीत. व एखादा पेशंट ऍडमिट झाला तर त्यास स्वखर्चाने वेगवेगळ्या चाचण्या बाहेर करून घ्याव्या लागतात त्या म्हणजे सिटीस्कॅन , सोनोग्राफी,एम आर आय परंतु या चाचण्या कित्येक जणांना गरिबीमुळे करता येत नाहीत त्यामुळे कित्येक लोकांना मृत्यूस सामोरे जावे लागते. तरी शासन व प्रशासनाने लोकांच्या ह्या गरजा ओळखून या सर्व गोष्टी उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपलब्ध करून द्याव्यात अन्यथा येणाऱ्या काळामध्ये भारतीय युवा पॅंथरच्या माध्यमातून मोठे आंदोलन उभे केले जाईल. तरी या सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्या न झाल्यास संघटनेच्या वतीने तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येईल असे भारतीय युवा पॅंथरच्या महिला आघाडीच्या पश्चिम महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मंगलताई जाधव यांनी निवेदनाद्वारे इशारा दिला आहे