कु.स्वरा भागवत हिच्या उपचारासाठी  खा.श्रीकांत शिंदेसाहेब यांच्या माध्यमातुन झाली  मदत – श्री.नानासो उर्फ पिंटु इवरे शिवसेना तालुकाप्रमुख

फलटण : दि. 11 सप्टेंबर
जेष्ठ पत्रकार कै.रांजेद्र भागवत व त्यांची नात कु. स्वरा हे 29 ऑगस्ट रोजी बारामती येथील शारदा नगर (माळेगाव)  या ठिकाणी शाळेत जात असताना त्यांचा अपघात झाला त्यामध्ये राजेंद्र भागवत यांचे निधन झाले व कु. स्वरा इस गंभीर दुखापत झाली या घटनेने फलटण तालुक्या मध्ये हळ- हळ व्यक्त होत होती घडलेल्या घटनेमुळे संपूर्ण फलटण तालुक्यामध्ये शोककळा पसरलेली दिसून येत होती  या अपघातात कु.स्वरा भागवत हिस गंभीर दुखापत झाल्यामुळे तिच्यावर बारामती येथील हाॅस्पीटल मध्ये उपचार चालु होते.
            परंतु पुढील उपचारासाठी कु.स्वरा ला पुणे येथील संचती हाॅस्पीटलला दाखल करावे लागले होते.
                   कै.राजेंद्र भागवत याच्या प्रमाणेच भागवत  कुटुंबातील योगेश,निलेश,रुपेश,या तिन्ही मुलांचा मित्र परिवार मोठा आहे.
तात्यांच्या जाण्याचे दुःख सर्वांनाच होतं पण कु.स्वरा हि पहिल्या सारखीच 100 टक्के बरी व्हावी हि या सर्व मित्र परिवाराची, कुटुंबाची व हितचिंतकांची एकच इच्छा होती व कु.स्वरा हि पुन्हा आपल्या खेळामध्ये पहिल्यासारखीच खेळावी  व आपल्या खेळातून तिने खूप मोठे व्हावे ह्या अपेक्षा मित्र परिवाराच्या व कुटुंबीयांच्या  होत्या त्या पूर्ण होण्यासाठी ती ठिक होणे गरजेचे होते. अशी चर्चा होत असतानाच
                  ती ला संचती हॉस्पिटलला दाखल केल्याचे फलटण तालुका शिवसेना प्रमुख श्री.नानासो उर्फ पिंटु इवरे यांना समजले त्यांनी तातडीने स्वराचे वडील योगेश यांच्याशी संपर्क करत उपचार व खर्चा संबधी माहीती घेत
उपमुख्यमंत्री मा.ना.एकनाथजी शिंदे साहेब यांचे स्विय साह्यक तथा उपमुख्यमंत्री आरोग्य कक्ष प्रमुख मा.श्री मंगेशजी चिवटे साहेब याना सर्व परस्तिथी सांगीतली व स्वरा हि भविष्यातील एक उत्कृष्ट खेळाडु असुन खेळातील   अनेक रेकाॅर्डची नोंद तिच्या नावावर आहे तसेच तात्या हे जेष्ट पत्रकार होते व त्यांच्या सामाजीक कार्या विषयीची माहीती हि त्यांना दिली हे सर्व ऐकुन चिवटे साहेबानी कोणत्याही परस्तिथीत स्वराला मदत झाली पाहिजे म्हणुन स्वत: योगेश भागवत व संचती हॉस्पिटलच्या  व्यवस्थापनाशी  संपर्क करुन स्वराचे अल्प खर्चात उपचार करण्यास सांगीतले.
त्याच प्रमाणे मा.खासदार श्रीकांत शिंदे साहेब यानी हि संचती हॉस्पिटल व्यस्थपनास स्वराचे उपचार अल्प खर्चात करण्याच्या  सुचना केल्या व  स्वरा लवकरात लवकर ठिक होवुन पुर्वीप्रमाने खेळायला लागेल अशी आशा व्यक्त केली.
या सर्व प्रक्रियेत श्री.गजानन नारलवार साहेब यानी हे सर्व उपचार होई प्रर्यंत संपर्कात राहुन मार्गदर्शन व मदत केली.त्याच प्रमाणे संचती हॉस्पिटलच्या  व्यवस्थपनाने पण मोलाचे सहकार्य केले
फलटण तालुक्याची एक उदयन्मुंखी खेळाडु कु.स्वरा ही लवरात लवकर बरी व्हावी हि सर्व भागवत कुटुंबाच्या हितचिंतकांची व फलटण तालुका शिवसेनाप्रमुख श्री नानासो उर्फ पिंटू इवरे व सर्व शिवसेना पदाधिकाऱ्यांची  परमेश्वर चरणी प्रार्थना आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!