* श्री. झाकीरभाई मणेर वस्ताद (सावकार ) माजी नगरसेवक यांना राष्ट्रीय खलिफा पुरस्कार प्राप्त……

फलटण. तृतीय महाराष्ट्र कुस्ती संमेलन 2025 च्या समारंभ प्रसंगी सुजन फाउंडेशन आदर्की बुद्रुक तालुका फलटण जिल्हा सातारा यांच्या वतीने निमंत्रक कुस्ती मित्र श्री संपतराव जाधव यांचे वतीने राष्ट्रीय खलिफा पुरस्कार 2025 फलटण येथील जाकीर भाई मणेर (वस्ताद) यांच्या कुस्ती, व सामाजिक क्षेत्रातील व क्रीडा क्षेत्रातील विशेष कार्याच्या गौरवअर्थ आणि देश हिताच्या उचित कार्याचा गुणगौरव करण्यासाठी बहुसंख्य मान्यवरांच्या उपस्थितीत फलटण येथील शुक्रवार पेठ तालीम मंडळाचे माजी मल्ल आणि सामाजिक कार्यकर्ते झाकीर भाई मणेर (वस्ताद) यांचा आदर्की बुद्रुक येथे संपत्नीक सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
महाराष्ट्र कुस्ती संमेलन आणि सुजन फाउंडेशन आदर्की बुद्रुक यांनी त्यांच्या कार्याची दखल घेऊन उचित गौरव केल्याबद्दल फलटण येथील सर्वच सामाजिक राजकीय आणि शुक्रवार पेठ तालीम मंडळ व रविवार पेठ येथील व्यापाऱ्यांच्या वतीने फलटण नगर परिषदेचे माजी नगरसेवक श्री झाकीर भाई मनेर यांचे अभिनंदन करण्यात येत आहे