फलटण तालुक्यातील आसू येथे ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल होऊनही आरोपीला अटक नाही : पीडित कुटुंबाची ” पोलिस संरक्षणाची” मागणी…….

फलटण : दि. 2 डिसें. 2025 आसू ता.फलटण येथे दि. 30 /11 /2025 रोजी दुपारी 3.30 च्या सुमारास सौ रमा नंदकुमार पवार व तिचे पती नंदकुमार पवार हे आसू कडून बारामतीकडे जात असताना “राजन दिनकर फराटे” यांनी त्यांची चार चाकी गाडी नीरा नदीच्या बंधार्यावरती आडवी उभी करून सौ. रमा नंदकुमार पवार आणि तिच्या पतीला जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण केल्याची तक्रार पीडितांनी ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल करून आरोपीस तात्काळ अटक करावे अशी मागणी केली आहे व त्यांच्या कुटुंबाला पोलिस संरक्षण देण्याची विनंती केली आहे.
आरोपी हा धन दांडगा व राजकीय पुढारी असल्यामुळे त्याचा गावामध्ये राजकीय दबाव आहे त्यामुळे फिर्यादीची जात माहित असताना सुद्धा त्यांना जातीवादी शिवीगाळ करून मारहाण केलेली आहे असे फिर्यादीने आपल्या फिर्यादीत म्हटले आहे.
या प्रकरणी फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम 1989 तसेच भारतीय दंड संहिता 2023 अंतर्गत गुन्हा दाखल झाला असताना सुद्धा अद्याप हि आरोपीस अटक झालेली नाही. तरी आरोपीस तात्काळ अटक करावी
पीडित कुटुंबाला सुरक्षितता व दोन समाजामध्ये तेढ निर्माण होऊन पुन्हा कसलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून तात्काळ पोलीस संरक्षण मिळावे अशी मागणी निवेदनाच्या माध्यमातून केली आहे.
त्याच्या प्रती खालील सर्व अधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या आहेत.
मा. प्रति
मा. जिल्हाधिकारी सो सातारा
मा. जिल्हा पोलिस अधिक्षक सो सातारा
मा. आयुक्त समाज कल्याण सो सातारा
मा. नोडल ऑफिसर सो सातारा
मा. उपविभागीय पोलिस अधिकारी सो फलटण
मा. पोलिस निरीक्षक सो फलटण ग्रामीण पोलिस ठाणे
मा. तहसिलदार सो फलटण



